भारतीय गव्हाच्या मागणीत आणखी वाढ

इजिप्त,तुर्की, इराण ,चीनसारख्या कृषी मालाच्या उत्पादक देशांपासून ते नायजेरिया, बोस्निया, सुदानसारख्या अनेक देशांनी भारताकडे गव्हासाठी मागणी नोंदवली आहे. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या सर्वच देशांसोबत गहू निर्यातीबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत.
India in talks with Egypt, China, others to export wheat
India in talks with Egypt, China, others to export wheat

रशिया युक्रेन संघर्षामुळं जगभरात खाद्य संकट निर्माण झालं असून प्रत्येक देश आपली अंतर्गत अन्न गरज भागवण्यासाठी अत्यावश्यक धान्य साठा करतो आहे. या दोन्ही देशांतील ताणतणावामुळं अनेक देशांनी भारताकडे गव्हासाठी (Wheat) विचारणा केली आहे. 

इजिप्त,तुर्की, इराण ,चीनसारख्या कृषी मालाच्या उत्पादक देशांपासून ते नायजेरिया, बोस्निया, सुदानसारख्या अनेक देशांनी भारताकडे गव्हासाठी मागणी नोंदवली आहे.  केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या सर्वच देशांसोबत गहू निर्यातीबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत.  

ही वाढीव मागणी भागवण्यासाठी केंद्र सरकारसह अपेडाकडूनही (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) प्रयत्न करण्यात येताहेत. 

अपेडाने (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) निर्यातीसंदर्भात नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय, रेल्वे आणि विविध राज्यांच्या प्रतिनिधींसह सर्वांनीच हजेरी लावली होती. 

या बैठकीत सुलभ निर्यातीसाठी रेल्वे आणि जल वाहतूक विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.  रेल्वे विभागाने गव्हाच्या (Wheat) अतिरिक्त वाहतुकीसाठी पुरेशा प्रमाणात डबे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिलीय. बंदर प्रशासनानेही निर्यातीसाठी राखीव टर्मिनल्स उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केलाय.तसेच पुरेशा प्रमाणात कंटेनर्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही बंदर प्रशासनानं सांगितलं आहे.      

जगातील अन्य गहू निर्यातदार (Wheat Exporter) देशांच्या तुलनेत भारताची गहू निर्यात कमी आहे. गव्हाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात युनिट प्राईस महत्वाची भूमिका बजावत असते. मागील पाच वर्षांत अनेक देशांच्या गहू युनिट प्राईसमध्ये वाढ झालेली आहे. अन्य देशांच्या युनिट प्राईसच्या तुलनेत भारताची युनिट प्राईस जास्त आहे, भारताची गहू निर्यात (Wheat Export) कमी असण्यामागे हेही एक कारण असल्याचं अंगमुथू यांनी नमूद केलं आहे.

वाहतूकदार, निर्यातदार, शेतकरी उत्पादक संघटना आणि राज्यांच्या सहकार्याने भारत निर्यात वाढीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अपेडाचे अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी दिली आहे.    

व्हिडीओ पहा- 

अपेडाकडून निर्यात होणाऱ्या मालाच्या प्रामाणिकरणाची प्रक्रियाही वेगाने राबवण्यात येत आहे. निर्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांची गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी अपेडाने २२० चाचणी केंद्रांना संमती दिली असल्याचेही अंगमुथू यांनी नमूद केलं आहे. 

कसे आहे भारताच्या गहू निर्यातीचे चित्र 

२०२१-२०२२  दरम्यान (एप्रिल ते जानेवारी)  भारताने १७४२ लाख डॉलर्सची कमाई गहू निर्यातीतून केली आहे. २०२०-२०२१ दरम्यान याच कालावधीत भारतानं गहू निर्यातीच्या माध्यमातून केवळ ३४०.१७ लाख डॉलर्सची कमाई केली होती. गेल्या ३ वर्षांत भारताने २०२०-२०२१ च्या पहिल्या १० महिन्यांतील निर्यातीसह) २३५२.२२ लाख डॉलर्सचा गहू जागतिक बाजारात विकला आहे.    

जागतिक बाजारात भारत हा प्रमुख दहा गहू निर्यातदारांपैकी (Wheat Exporters) एक असला रशिया- युरोप संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारताची गहू निर्यात इतर स्पर्धकांपेक्षा वाढली आहे. भारत साधरणतः बांगलादेशसह अनेक शेजारी देशांना गव्हाचा पुरवठा करतो. मात्र आता भारताने इंडोनेशिया, अफगाणिस्तान, येमेन ,कतार या देशांनाही नव्याने गहू (Wheat) पुरवायला सुरुवात केली आहे.  

२०२०-२०२१ दरम्यान भारताने बांगलादेश, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, येमेन, अफगाणिस्तान, कतार, ओमान, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांना गहू निर्यात केला होता. भारताचे गहू उत्पादन (Wheat Production) वर्षाकाठी सरासरी १०७.५९ लाख मेट्रिक टन असून  उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश हे प्रमुख गहू उत्पादक (Wheat Producer) राज्य आहेत.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com