'मधु क्रांती'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ४५ प्रकल्पांना अर्थसहाय्य

केंद्र सरकारने 'मधु क्रांती'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात शास्त्रशुद्ध मधमाशी पालनाचा सर्वांगीण प्रचार आणि विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मधु क्रांतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानांतर्गत ८८.८७ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह सरकारने ४५ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
Honey Bee
Honey Bee

केंद्र सरकारने 'मधु क्रांती'चे (Sweet Revolution) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात शास्त्रशुद्ध मधमाशी पालनाचा (Scientific Bee Keeping ) सर्वांगीण प्रचार आणि विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मधु क्रांतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानांतर्गत (National Beekeeping and Honey Mission) ८८.८७ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह सरकारने ४५ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.  

२०२१-२२ च्या आर्थिक पाहणी सर्वेक्षणामध्ये (Economic Survey for 2021-22) म्हटल्यानुसार, एकात्मिक शेती पद्धतीचा (integrated farming system) भाग म्हणून मधमाशी पालनाचे महत्त्व लक्षात घेवून देशात सरकारने २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाची घोषणा करण्यात आली आहे.

देशातील वैविध्यपूर्ण हवामानामुळे मधमाशी पालन, मध उत्पादन आणि मध निर्यातीसाठी मोठी संधी आहे. मधमाशी पालन हा ग्रामीण भागातील शेतकरी आणि भूमिहीन मजुरांसाठी कृषिपूरक व्यवसाय आहे. मधमाशी पालनामुळे पिकांचे परागीभवन होण्यास मदत होते. ज्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com