जनावरांना वरचे दात नसून पण दातांवरून वय कसे ओळखाल?

माणसाप्रमाणे जनावरांमध्येही आयुष्यात दोन वेळा दात येत असतात.गायी-म्हशींमध्येही सुरवातीला दुधाचे दात असतात तर नंतर कायमचे दात येतात.
Age Identification Of Animal By Teeth Method
Age Identification Of Animal By Teeth Method

माणसाप्रमाणे जनावरांमध्येही आयुष्यात दोन वेळा दात येत असतात. गायी-म्हशींमध्येही सुरवातीला दुधाचे दात असतात तर नंतर कायमचे दात येतात. दुधाचे दात पडल्यावर येतात ते असतात कायमचे दात. दुधाचे दात आकाराने लहान असून पांढऱ्या रंगाचे असतात. याउलट कायमचे दात आकाराने मोठे असून पिवळसर रंगाचे असतात. जनावरांच्या दातांचे वर्गीकरण तीन प्रकारात केलं जातं-

-    समोरील पटाशीचे दात

-    बाजुचे सुळे दात

-    दाढा – समोरील आणि मागील दाढा

जनावरांचे वय (Age)ओळखण्यासाठी समोरील पटाशीच्या दातांचा उपयोग केला जातो. गाय, म्हैस, शेळी, मेंढी यासारख्या प्राण्यांमध्ये वरच्या जबड्यात पटाशीचे दात नसतात, त्याजागी कठीण मांसल जागा असते. खालच्या जबड्यात पटाशीचे आठ दात असतात. तसेच पुढील व मागील जबड्यात प्रत्येकी सहा- सहा दाढा असे एकूण ३२ दात असतात.

हेही पाहा- मुक्त संचार गोठा पद्धत 

गायी- म्हशींचे दात-

  • दुधाच्या दातांमध्ये आठ पटाशीचे दात आणि समोरील बारा दाढा असे एकूण वीस दात असतात.
  • दुधाचे दात पंधरा ते अठरा महिन्यापर्यंत असतात, पुढे ते पडून पक्के दात येत असतात.
  • कायमचे पक्के दात ३२ असतात.
  • दोन ते अडीच वर्षामध्ये मधले दोन पक्के पटाशीचे दात येतात.
  • तीन ते साडे तीन वर्षात चार पक्के पटाशीचे दात येतात. कोणतेही नवीन जनावर विकत घेताना आपण ते चार दाती घ्यावं असं म्हंटल जातं.
  • चार ते पाच वर्षात सहा पक्के पटाशीचे दात येतात.
  • पाच ते सहा वर्षात आठ पक्के पटाशीचे दात येतात.
  • सहा ते सात वर्षात पूर्ण पक्के दात येतात.
  • बारा वर्षाच्या पुढे दातांची झीज झाल्यामुळे दातावरून वय ओळखणे अवघड जाते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com