Road development : सुरक्षित प्रवासासाठी १०० कोटींचा खर्च

लवकरच वरंध घाट मार्ग प्रवाशांकरिता सुकर होणार आहे. या नव्या रस्त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये अपेक्षित खर्च येणार आहे.
Road development
Road developmentAgrowon

महाड : अरुंद रस्ता, तसेच वारंवार नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडणाऱ्या वाहतुकीमुळे पुणे व पंढरपूर येथे जाण्यासाठी उपयुक्त असलेला वरंध घाट (Varandh Ghat) मार्ग धोकादायक बनला होता.

आता हा मार्ग राष्ट्रीय महामर्गाकडे वर्ग करण्यात आला असून, काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम वेगाने (Road Work Start) सुरू आहे. त्‍यामुळे लवकरच वरंध घाट मार्ग प्रवाशांकरिता सुकर होणार आहे. या नव्या रस्त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये अपेक्षित खर्च येणार आहे.

महाड-वरंध घाट भोरमार्गे पुणे हा सुमारे १२० किलोमीटरचा रस्ता असून पुणे येथे जाण्यासाठी हा सर्वाxत जुना मार्ग आहे.

हाच रस्ता पंढरपूर येथे जात असल्याने राज्यमार्ग म्हणून ओळखला जात होता; परंतु काही वर्षांपूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

पुणे येथून महाडकडे येण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने या ठिकाणाहून नेहमीच प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते; परंतु मागील काही वर्षांपासून अतिवृष्टीमुळे रस्ता व वरंध घाट धोकादायक स्थितीमध्ये होता.

अनेकदा घाट मार्ग वाहनांसाठी बंदही करण्यात आला होता. त्‍यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या ताम्हिणी घाटमार्गे सुरू होत्या. वरंध घाटातील गैरसोयीमुळे प्रवाशांना दूरचे अंतर कापून पुणे व पंढरपूर येथे जावे लागायचे, परंतु आता ही गैरसोय दूर होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुणे व पंढरपूर रुंदीकरण, काँक्रिटीकरण तसेच डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे घाटातील प्रवासाचा मार्ग सुकर होणार आहे.

Road development
Rural Road Issue : पाणंद रस्त्यांच्या कामांना ‘ब्रेक’

कामे दृष्टीपथात -

१) मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी ते वरंध घाटातील महाडपर्यंतच्या २२.६०० किमी लांबीच्या मार्गासाठी १०० कोटींच्या निविदांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

२) राजेवाडीपासून आकले गावापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत प्राथमिक स्तरावरील कामे सुरू आहेत. राजेवाडी ते वरंध गावापर्यंत काँक्रिटीकरण, तर घाटातील रस्‍त्‍याचे डांबरीकरण केले जाणार आहे.

३) राजेवाडी ते वरंध मार्गावर माझेरी वाघजाई मंदिरापर्यंत घाटमाथ्यामध्ये संरक्षक भिंत, गॅबियन वॉलसह एकूण बावीस किमीच्या मार्गावर सहा छोटे पूल व सुमारे ९० पाईप मोऱ्या बांधण्यात येणार आहेत.

औद्योगिक विकासासह पर्यटनाला चालना

काही वर्षांपासून महाड-पुणे मार्गावरील हा घाट नादुरुस्त झाल्याने, तसेच दरडी कोसळल्याच्या घटना व भूस्खलनामुळे हा मार्ग वारंवार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत होता. त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले होते.

वरंध भागातील तसेच वाघजाई परिसरातील व्यवसायही संकटात सापडले होते; परंतु आता रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने पर्यटन व औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाच्या राजेवाडी ते वरंध महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. वरंध गावापर्यंत काँक्रिटीकरण व पुढे आठ किलोमीटर डांबरीकरण केले जाणार आहे.
अमोल महाडकर, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com