
सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून गाळप हंगामास (Sugarcane Season) गती आली आहे. सांगली जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी आजअखेर १४ लाख २० हजार २९७ टनांचे गाळप (Sugarcane Crushing) करून १४ लाख १३ हजार ३६३ क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) घेतले आहे.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १ लाख ३७ हजार ५८५ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी आहे. जिल्ह्यात १८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी यंदाच्या हंगामात १३ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांवर ऊस तोड मजूर दाखल झाले होते. परंतु हंगामाच्या प्रारंभावेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले होते. त्यामुळे हंगाम उशिरा सुरू झाला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या पट्ट्यात गाळपास गती नव्हती. त्यानंतर हंगामास गती आली आहे. गाळपात सांगलीच्या दत्त इंडिया कारखान्याने तर साखर उताऱ्यात वांगीच्या सोनहिरा कारखान्याने आघाडी घेतली आहे.
महिना झाला साखर करखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. अवकाळी पाऊस, शेतकरी संघटनांची आंदोलने यामुळे विस्कळीत झालेला हंगाम आता गती घेत आहे.
जिल्ह्यातील १३ कारखान्यांचे आतापर्यंतचे गाळप असे ः
कारखाने गाळप (टनांमध्ये) साखर उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)
दत्त इंडिया सांगली २,०८,५८५ १,९९,६५० ९.५७
राजारामबापू साखराळे १,१३,९६० १,१०,४०० ९.६९
विश्वास चिखली १,०९,४३० १,१३,११० १०.३४
हुतात्मा वाळवा ६३,३१० ४९,९५० ७.८९
राजारामबापू वाटेगाव ८४,५७० ८९,९०० १०.६३
राजारामबापू तिपेहल्ली ६७,४५५ ६५,३८५ ९.६९
सोनहीरा वांगी १,४९,७१० १,६६,६१० ११.१३
क्रांती कुंडल १,५५,००० १,६२,३४० १०.४७
सर्वोदय कारंदवाडी ६१,९६० ६७,५९० १०.९१
मोहनराव शिंदे ८५,३५० ८२,४५० ९.६६
निनाई दालमिया ७०,०२० ७०,६०० १०.०८
उदगिरी १,०९,१६० १,१५,८५० १०.६१
सद्गुगुरू राजेवाडी १,४१,७८७ १,१९,५२८ ८.४३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.