
नांदेड : गायरान जमीन विक्रीसाठी शासनाची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्याकडून परवानगी अर्जासाठी पंधरा हजार मागणाऱ्या महसूल सहायकासह (Revenue Officer) एका खासगी व्यक्तीविरुध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई (Anti-Corruption Department) करण्यात आली आहे.
गायरान जमीन खरेदी विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी लागते. या परवानगी आदेशाची प्रत मिळण्यासाठी तहसील कार्यालय येथे जमीन विक्री करणार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी दिलेल्या अर्जावर कार्यवाही न झाल्याने तक्रारदार यांनी परत अर्ज दिला.
त्यावेळी भोकर तहसील कार्यालयातील महसूल सहायक सुभाष रघुनाथ कोंडलवार याने खासगी व्यक्ती दीपक चंद्रकांत घोगरे यांच्यामार्फत तक्रारदारास गायरान पट्ट्याची परवानगी आदेश प्रतीची नक्कल देण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर महसूल सहायक सुभाष रघुनाथ कोंडलवार व खासगी व्यक्ती दीपक चंद्रकांत घोगरे यांनी मागणी केलेल्या लाचेची पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदारास आदेशाची नक्कल देऊन काम केले आहे.
त्याबद्दल बक्षीस म्हणून त्यांना पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती बारा हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे, अशी माहिती पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक डॉ राजकुमार शिंदे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नानासाहेब कदम यांनी सापळा कारवाई केली. त्यांच्या पथकात पोकॉ संतोष वच्चेवार, गणेश तालकोकुलवार, पोकॉ ईश्वर जाधव, प्रकाश मामुलवार, गजानन राऊत, नीलकंठ यमुनवाड आदींचा समावेश होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.