Crop Damage : नुकसानग्रस्तांना पुरेशी मदत मिळालेली नाही : भुजबळ

अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना शासनाकडून पुरेशा प्रमाणात मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच भविष्यात आपल्या हिताची जोपासना करणारे कोण आहे, याबाबत आपला निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केले.

Crop Damage
Crop Damage : तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार येथे मंगळवारी (ता. १८) मका व भुसार मालाच्या लिलावास प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. त्यांनी या वेळी शेतीमालाच्या लिलाव प्रक्रियेतही सहभाग घेतला. या वेळी तहसीलदार प्रमोद हिले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती संजय बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ॲड. बाबासाहेब देशमुख, किसनराव धनगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काले, योगेश जहागीरदार, मकरंद सोनवणे, बाजार समितीचे प्रशासक प्रताप पाडवी, सचिन कळमकर यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, की राज्यात अनेक कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यापैकी अनेक कामांची स्थगिती अद्याप कायम आहे. त्यामुळे विकासाची कामे रखडली आहेत. त्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे; मात्र सर्व कामे आपण पूर्ण करू, असे सांगत शेतकरी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठांचे विकेंद्रीकरण गरजेचे शेतकऱ्यांना आपला पिकवलेला शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.

देशात ६० टक्क्यांहून अधिक लोक शेती करत आहेत. देशात कृषी क्षेत्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी क्रांती झाली. त्यातून देश मोठ्या प्रमाणात शेतीमाल निर्यात करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मार्केट उपलब्ध होण्यासाठी मार्केटच विकेंद्रीकरण करणे अतिशय महत्त्वाचे असून तालुक्यात उपबाजार सुरू करण्यात आले आहेत. त्यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत आहे, असे छगन भुजबळ यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com