Agriculture Festival : जिल्हास्तरीय कृषी तरंग कला- क्रीडा महोत्सव

प्रत्येक तालुक्यातील कृषी विभागातील महिला, पुरुष अधिकारी, कर्मचारी यांनी वैयक्तिक, सांघिक खेळातून आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंदोत्सव साजरा केला.
Parbhani News
Parbhani NewsAgrowon

परभणी : कृषी विभागातर्फे (Agriculture Department) जिल्हास्तरीय २०२२-२३ कृषी तरंग कला-क्रीडा महोसत्व (Agriculture Festival) विविध कार्यक्रमाने रंगला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील (VNMKV) जिमखाना क्रीडांगण येथे (ता. २०) वनामकृवीचे अधिष्ठाता डॉ. ध. नि. गोखले यांच्या हस्ते कृषी तरंग कला क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन बैलांचे औक्षण, पूजन करून करण्यात आले करण्यात आले. या वेळी डॉ. व्ही. व्ही. लोखंडे आदींची उपस्थिती होती.

डॉ. गोखले म्हणाले, की सर्व अधिकारी, कर्मचारी खेळाडू यांनी आपल्या मध्ये असलेल्या सुप्तगुणाला वाव देत खेळातून आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले पाहिजे.

त्यानंतर डॉ. लोखंडे म्हणाले, की तीन दिवस होणाऱ्या कृषी तरंग कला-क्रीडा कार्यक्रमातून अधिकारी कर्मचारी यांनी मनावर कामाचा ताण न घेता, कुठलेही दडपण न घेता मनसोक्त आनंद घ्यावा

Parbhani News
Crop Insurance : विमा भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण सुरूच

याप्रसंगी प्रत्येक तालुक्याने पथसंचलनाच्या माध्यमातून विविध देखावे, जनजागृतीपर संदेश देणारे फलक, विविध गीतांतून जनजागृती करुण थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला.

त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील कृषी विभागातील महिला, पुरुष अधिकारी, कर्मचारी यांनी वैयक्तिक, सांघिक खेळातून आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंदोत्सव साजरा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com