Solar Energy : अमरावतीतील अंगणवाड्या सौरऊर्जेमुळे प्रकाशमान

काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नाही. त्यामुळे तेथे येणाऱ्या चिमुकल्यांसोबतच लाभार्थ्यांना आपले पाणी सोबतच आणावे लागते.
Solar Energy
Solar EnergyAgrowon

परतवाडा, अमरावती : अंगणवाड्यांमध्ये (Amravati Anganwadi School) उपाययोजना करण्याचे काम सुरू असून, नुकताच सोलर पॅनेल (Solar Panel) बसवण्यात आले आहे. यामुळे आता अंगणवाड्या प्रकाशमान झाल्याने तिथे येणाऱ्या लाभार्थ्यांसह चिमुकल्यांना सोयीचे झाले आहे.

लावण्यात आलेल्या उपकरणांमध्ये पाच लाइट व एका पंख्याचा समावेश आहे. यामुळे बऱ्याच समस्या सुटल्या असल्या, तरी अंगणवाडीतील इतर समस्याही प्रशासनाने सोडवाव्यात, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांसह गरोदर, स्तनदा माता आदी लाभार्थ्यांना पोषण व सकस आहार वितरित करण्यात येतो.

तर बऱ्याच अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांचे लसीकरण करण्यात येते. मात्र या अंगणवाड्यांकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नाही. त्यामुळे तेथे येणाऱ्या चिमुकल्यांसोबतच लाभार्थ्यांना आपले पाणी सोबतच आणावे लागते.

अथवा पाण्यासाठी पुन्हा घरी जावे लागते. अंगणवाडीत विद्युतपुरवठा नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत उकाड्यात राहावे लागते.

विद्युतअभावी अंगणवाड्यांत पुरेसा प्रकाश नसतो. बऱ्याच अंगणवाडी परिसरात गाजरगवत, गटारे व घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे व राज्यभरातील अंगणवाड्यांना सोयीसुविधांसोबतच स्वच्छतेचा बूस्टर डोस द्यावा. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने यापूर्वी प्रकाशित केले होते.

Solar Energy
Solar Light Trap : सौर प्रकाश सापळा बसविण्यासाठी ७५ टक्के अनुदान

आता प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाल्या आहेत. जिथे विद्युतपुरवठा नाही, अशा अंगणवाडीमध्ये सौर पॅनेल बसवण्यात आले असून, यामध्ये पाच लाइट व एक स्टँड फॅन आदी उपकरणे चालू आहेत.

त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय यांसह स्वच्छ व सुंदर अंगणवाड्या कशा होतील, यादृष्टीने प्रयत्न केले जावेत, अशा भावनाही यानिमित्ताने पालक वर्गाकडून व्यक्त होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com