Sugarcane Rate : ‘भीमाशंकर’ कडून मागील हंगामासाठी अंतिम ऊसदर २८०० रुपये जाहीर

मागील २०२१-२२ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊसदर २८०० रुपये प्रति टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
Bhimashankar Sugar Mill
Bhimashankar Sugar MillAgrowon

पारगाव, जि. पुणे : दत्तात्रयनगर (पारगाव), ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मागील २०२१-२२ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊसदर २८०० रुपये प्रति टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे (Balasabh Bende)यांनी दिली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०२१-२२ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ८६ हजार ४२६ टनांसाठी कारखान्याने यापूर्वी एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर)नुसार २६४२ रुपये प्रति टनाप्रमाणे होणारी रक्कम एकरकमी ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. उर्वरित अंतिम हप्ता १५८ रुपये प्रति टनामधून भीमाशंकर शिक्षण संस्था निधी आठ रुपये प्रति टन वजा जाता शिल्लक १५० रुपये प्रति टनाप्रमाणे होणारी एकूण रक्कम १७ कोटी ८० लाख ऊस उत्पादकांचे बँक खात्यावर गुरुवारी (दि. २०) वर्ग करण्यात आले.

Bhimashankar Sugar Mill
Crop Damage : अतिवृष्टिग्रस्तांना ७१८ कोटी मदत निधीचे वितरण सुरू

दिलीप वळसे पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत तसेच बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रमात दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादकांची दिवाळी गोड केली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत डिस्टिलरी प्रकल्प नसतानाही चांगला ऊस दर दिल्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कारखान्याने एफआरपीची रक्कम वेळेत तर दिलेलीच आहे त्याशिवाय एफआरपीपेक्षा जास्त रक्कम अंतिम हप्त्याचे स्वरूपात शेतकऱ्यांना अदा करण्याचे निश्‍चित केले आहे. गाळप हंगाम २०२२-२३ करिता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी, असे आवाहन श्री. बेंडे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com