
Pune News : कृषी क्षेत्रात कार्यरत ‘बायफ’ (BAIF) आणि फ्रान्सच्या नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर, फूड ॲण्ड एन्व्हारमेंट या दोन संस्थांमध्ये नुकताच सामंजस्य करार पार पडला आहे.
उरळी कांचन येथील बायफ संस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला फ्रान्सच्या कृषी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिलिप मॉगिन, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या संचालक मॅडम सेगोलीन हॅली डेस फॉन्टेनेस, वैज्ञानिक अधिकारी डॉ. एडमंड रॉक आणि बायफचे अध्यक्ष भरत काकडे उपस्थित होते.
पशुधन आणि पिकांतील आनुवंशिकी बदल, जमीन आणि पाणी पुनर्संचयन, कृषी जैवविविधता संवर्धन, कृषी वनीकरण आदींबाबत हा करार केला. फ्रान्सच्या शिष्टमंडळाने बायफ संस्थेतील आनुवंशिकी आणि जीनोमिक्स प्रयोगशाळा, वीर्य उत्पादन बँक, आण्विक अनुवांशिक प्रयोगशाळा आदी प्रयोगशाळांना भेट दिली.
या करारामुळे भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, अशा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘बायफमधील ५० हून अधिक शास्त्रज्ञ पशुधन संशोधनातील प्रगतीसाठी फ्रान्समधील संशोधन संस्थांमध्ये जातील.
तसेच फ्रान्सच्या या संस्थेतूनही २० हून अधिक शास्त्रज्ञांनी सहयोगी संशोधन कार्यक्रमांसाठी बायफला भेट दिली आहे.
फ्रान्सच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना पशुधन आणि कृषी विकासातील क्षेत्रीय अनुभवांसाठी बायफ कार्यरत असणार आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.