Palghar ZP News : लेटलतिफ कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रिक’चा चाप

जिल्हा परिषद प्रवेशद्वार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या बाहेर बायोमेट्रिक हजेरीची तीन मशीन बसवण्यात आली आहेत.
Biometric Punching
Biometric PunchingAgrowon

Zilla Parishad Palghar News : जिल्हा परिषद कार्यालयात काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशिराने येत असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाट पाहत बसावे लागते.

यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी अधिकारी व कर्मचारीवर्गाला वेळेची शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने बायोमेट्रिक प्रणाली (Biometric Attendance) १ फेब्रुवारीपासून अंमलात आणली.

यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांना (Let Comers) चाप बसल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. भानुदास पालवे यांनी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावून शुभारंभ केला.

जिल्हा परिषद प्रवेशद्वार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या बाहेर बायोमेट्रिक हजेरीची तीन मशीन बसवण्यात आली आहेत. यात २१३ अधिकारी व कर्मचारी यांची नोंदणी करण्यात आली असून अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामानिमित्त फिरतीवर असल्याने १८१ कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावली.

Biometric Punching
Fish Farming : पालघर तालुक्यात बेकायदा मंगूर मासेपालन

बायमेट्रिक हजेरी सर्व कर्मचारी व अधिकारी यांना बंधनकारक असून या पद्धतीमुळे कर्मचारी व अधिकारी यांच्या नियमित वेळेची नोंद होऊन सर्व कर्मचारी वेळेत कार्यालयात येतील, असे मत पालवे यांनी व्यक्त केले आहे.

Biometric Punching
Fish Farming : पालघर तालुक्यात बेकायदा मंगूर मासेपालन

मोखाड्यातही अंमलबजावणी

जिल्हा परिषदेच्या धर्तीवर तालुका स्तरावर पंचायत समिती आणि गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये देखील बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली आहे.

त्यानुसार मोखाडा पंचायत समितीसह सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती निकम यांनी दिली.

डहाणूत ग्रामसेवक, तलाठ्यांवर वचक..

तालुक्यातही बायोमेट्रिक हजेरी परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बायोमेट्रिक हजेरीच्या निर्णयामुळे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संबंधित गावातील ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com