Animal One - Health Scheme : जनावरांतील साथीच्या आजारांना आटकाव घालण्यासाठी केंद्र सरकारची योजना जाहीर

साथीच्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार १४ एप्रिल रोजी अॅनिमल एपिडेमिक प्रिपेअरनेस इनिशिएटिव्ह (एपीपीआय) आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने अॅनिमल हेल्थ सिस्टीम सपोर्ट फॉर वन हेल्थ (एएचएसओएच) हा प्रकल्प सुरू करणार आहे.
Animal One - Health Scheme
Animal One - Health SchemeAgrowon

अलीकडच्या काळात जनावरांमध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन साथीच्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार १४ एप्रिल रोजी अॅनिमल एपिडेमिक प्रिपेअरनेस इनिशिएटिव्ह (Animal Epidemiological Prepairness Initiative) (एपीपीआय) आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने अॅनिमल हेल्थ सिस्टीम सपोर्ट फॉर वन हेल्थ (Animal Health System Support for One Health) (एएचएसओएच) हा प्रकल्प सुरू करणार आहे.

हा प्रकल्प सुरुवातीला महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह पाच राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे.  या राज्यांमध्ये सर्वाधिक जनावरांचा साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव राजेशकुमार सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, जनावरांपासून माणसांमध्ये अनेक आजार पसरत आहेत.

भविष्यातील साथीच्या आजारापासून मानव, जनावरांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने होलिस्टिक वन हेल्थ नावाचा प्रकल्प सुरू केला जात आहे. केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी या योजनेला सुरुवात होणार आहे.

सुरुवातीला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम आणि ओडिशा या पाच राज्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव राजेशकुमार सिंह यांनी दिली.

Animal One - Health Scheme
Animal Health : जनावरांतील सुप्त गर्भाशयदाहाचा प्रतिबंध

या प्रकल्पात पाच राज्यांतील १५१ जिल्ह्यांचा समावेश असेल. या प्रकल्पांतर्गत प्रादेशिक व जिल्हा स्तरावर ७५ प्रयोगशाळा, ३०० पशुवैद्यकीय रुग्णालये, ९००० पॅरा पशुवैद्यकीय व्यावसायिक आणि ५५०० पशुवैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षित दिले जाईल.

त्यामुळे आजारी पशुधनावर अधिक जलद आणि प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. १२२८.७० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद असलेला हा प्रकल्प पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत असल्याची माहिती सचिवांनी दिली.

देशातील दूध उत्पादनात घट झाली नसून चाऱ्याचे दर वाढल्यामुळे दुधाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात दुग्धजन्य पदार्थांची आयात करावी लागणार आहे असे सचिव राजेशकुमार सिंह म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com