
पेड, जि. सांगली (Sangle News) : तासगाव तालुक्यातील पेड येथील तलावातून (Ped Talav) पूर्व बाजूकडे जाणाऱ्या कालव्याची (Canal) मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे कालव्याला पाणी न सुटल्याने रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत.
त्यामुळे कालव्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पेड येथील तलाव १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेमधून बांधण्यात आला. या तलावाची पाणी साठवण क्षमता ५५.४३ दशलक्ष घनफूट आहे.
या तलावातून पूर्व बाजूकडे जाणाऱ्या शेतीला पाणी देण्यासाठी जवळपास साडेपाच किलोमीटर लांबीचा कालवा काढण्यात आला होता. याच कालव्यामधून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी सोडण्यात येते.
या कालव्याच्या माध्यमातून जवळपास ५५० एकर लाभक्षेत्र ओलिताखाली आले आहे. तर येथील शेतकऱ्यांना पाणी देण्याची नियोजन हे तासगाव येथील पाटबंधारे विभागामार्फत केले जाते;
मात्र या कालव्याची गेल्या चार-पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या कालव्याची गेले अनेक वर्षापासून देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता तसेच डागडुजी करण्यात आलेली नाही.
तसेच कालव्यामध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच याची स्वच्छता न केल्यामुळे हा कालवा पूर्णपणे नादुरुस्त आहे. तसेच तलावाच्या निर्मितीपासून या कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले नसल्यामुळे जागोजागी या कालव्याला गळती लागलेली आहे.
या कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे या लाभक्षेत्रातील संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येत नाही त्यापैकी थोडेच क्षेत्र पाण्याखाली येत आहे. उर्वरित लाभक्षेत्र अजूनही तहानलेले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.