Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोती तलावात मृत माशांचा खच

सावंतवाडी शहरातील मोती तलावाचा कोसळलेला संरक्षक कठड्याच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार आहे. मत्स्यपालनाचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आलेला आहे.
Moti Lake
Moti LakeAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील (ता. सावंतवाडी) मोती तलावातील (Moti Lake) मासे मोठ्या प्रमाणात मृत (Dead Fish) झाले असून, ते तलावाकाठी कुजलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कोसळलेल्या संरक्षक कठड्याचे बांधकाम करण्यासाठी पाणी कमी केल्यामुळे हा प्रकार झाला आहे.

Moti Lake
Fish Dead in Panchganga: पंचगंगेत मृत माशांचा खच

सावंतवाडी शहरातील मोती तलावाचा कोसळलेला संरक्षक कठड्याच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार आहे. मत्स्यपालनाचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आलेला आहे.

Moti Lake
Fish Culture : उजनी जलाशयात ५० हजार मत्स्यबीज सोडले

दरम्यान, या तलावाचा एका ठिकाणचा संरक्षक कठडा कोसळला आहे. हा कोसळलेला कठडा बांधण्यासाठी तलावातील पाणी कमी करणे आवश्यक होते. त्यामुळे तलावातील पाणी कमी करण्यात आले असून, त्यामुळे गेल्या एक-दोन दिवसांत तलावातील मासे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात सावंतवाडी पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी भाऊ भिसे यांनी संरक्षण कठड्याचे काम करण्यासाठी तलावातील पाणी कमी केले. मासे मृत होत असतील, तर मत्स्यबीज पेरणाऱ्या ठेकेदार संस्थेला ते पकडण्यासाठी सूचना देण्यात येतील. दुर्गंधीबाबत उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com