Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या व गावकी-भावकीसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या अशा ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता.१८) अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत सुमारे ८०.७९ टक्के असे विक्रमी मतदान झाले.
Elections
ElectionsAgrowon

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची (ZP Election) रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या व गावकी-भावकीसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या अशा ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Election) रविवारी (ता.१८) अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत सुमारे ८०.७९ टक्के असे विक्रमी मतदान (Voting) झाले. या मतदारांचे भवितव्य आज (ता. २०) रोजी होणाऱ्या निकालात स्पष्ट होणार आहे. निवडणुकीचा निकाल प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय येथे होणार असून, त्याच दिवशी नवे गावकारभारी ठरणार आहेत.

Elections
Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान

जिल्ह्यात जाहीर झालेल्या २२१ पैकी २७ ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य आणि ४९ गावचे सरपंच यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित १७६ ग्रामपंचायतींच्या सर्व सदस्यांसाठी, १८ ग्रामपंचायतींच्या अंशतः जागांसाठी आणि १६७ गावांच्या सरपंचपदांसाठी उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

Elections
Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात ४३० ग्रामपंचायतींसाठी मतदान

पुणे जिल्ह्यातील जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुरंदर तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित १२ तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ ग्रामपंचायती या भोर तालुक्यातील आहेत. या निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा समावेश नाही. उर्वरित ११ तालुक्यांपैकी भोर पाठोपाठ वेल्हे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

यामध्ये चुरशीच्या ठरणाऱ्या प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तालुक्यातील घोडेगाव, चांडोली बुद्रुक, कळंब, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी, बारामतीतील लोणी भापकर, मोरगाव, पणदरे, वागजवाडी यांसह हर्णस कर्नावड, कारी, शिरवलीतर्फे भोर, वेळवंड, हातनोशी, साळुंगण (ता. भोर), दापोडी, बोरीभडक, दहिटणे (ता. दौंड), पिंपरी साहस, कदमवाकवस्ती, पेरणे, आव्हाळवाडी, गोगलवाडी (ता. हवेली), मदनवाडी, लाखेवाडी, डाळज नं. २, बिजवडी, कळशी, कुरवली, रेडणी, सराटी (ता. इंदापूर), साकोरी तर्फे बेल्हे, पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर), चास, बहुळ, मांजरेवाडी, शिरोली, शेलगाव (ता. खेड), वरसोली, गोडुंब्रे, शिरगाव (ता. मावळ), आडमाळ, मोसेखुर्द, पाथरशेत, कोंढूर (ता. मुळशी), मांडवगण फराटा, करंजावणे (ता. शिरूर) आणि दापोडे, धानेप, कोशिमघर, शिरकोली, वाजेघर बु (ता. वेल्हे) या गावांमधून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरपंचपदाच्या उमेदवारांचे जिवाचे रान :

ग्रामपंचायत निवडणुका पक्षचिन्हावर नसल्या तरी सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी येथे आपली ताकद पणाला लावलेली पाहायला मिळाली. अनेक गावांमध्ये दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढती झाल्या. यात काही अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब पणाला लावले आहे. पाच वर्षांत एकच सरपंच राहणार असला तरी पहिली उपरपंचपदाची संधी तुम्हालाच अशी प्रलोभने दाखवून सरपंचपदासाठी मतदान आपल्या पदरात पाडून घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com