
Nagar News : महावितरणच्या बेलापूर उपकेंद्रातून कमी दाबाने व पूर्ण वेळ वीजपुरवठा (Electricity Supply) होत नसल्याने पढेगाव, उंबरगाव, वळदगाव, बोधेगाव, मालुंजे, कान्हेगाव येथील शेतीचे मोठे नुकसान (Crop Damage) होत आहे.
या गावांना पूर्ण दाबाने व पुरेसा वीजपुरवठा करण्यात यावा, नवीन जादा क्षमतेचे रोहित्र (Transformer) बसवावे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या (Mahavitaran) अभियंत्यांना निवेदन दिले.
दहा दिवसांत मागणी मान्य न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. महावितरणचे बेलापूर येथे उपकेंद्र असून, यातून पाच एमव्हीएचे दोन व ३.१५ एमव्हीएचे एक रोहित्र कार्यान्वित आहे.
यांपैकी पाच एमव्हीएचे एक रोहित्र वारंवार नादुरुस्त होते. त्यामुळे बेलापूर, पढेगाव, उंबरगाव, वळदगाव, बोधेगाव, मालुंजे, कान्हेगाव येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. स्वतंत्र रोहित्र नसल्याने गावठाणालाही वीज मिळत नाही.
हातातोंडाशी आलेला घास महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे हिसकावला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पाचऐवजी दहा एमव्हीएचे नवीन रोहित्र बसवावे.
पढेगाव, मालुंजे येथे शेतीचे लाइन दुहेरी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी विजेच्या तारांचे घर्षण होऊन नानासाहेब लिप्टे यांचा तीन एकर ऊस जळाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.