
परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे (Rabi Jowar) सरासरी क्षेत्र १ लाख २४ हजार ७८६ हेक्टर असताना यंदा शुक्रवार (ता. २) पर्यंत ७२ हजार ६१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आजवरच्या एकूण रब्बी पेरणीमध्ये (Rabi Sowing) परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी २ लाख १३ हजार ४६३ हेक्टर (७८.८३ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ पैकी १ लाख ३७ हजार ५२५ हेक्टरवर (७७.७५ टक्के) अशी या दोन जिल्ह्यात मिळून एकूण ३ लाख ५० हजार ९८८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
परभणी जिल्ह्यात शुक्रवार पर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी ८७ हजार १२३ हेक्टरवर (५६.२५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची १ लाख १३ हजार ९० पैकी ५६ हजार ४८५ (४९.५८ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १५ हजार ४०६ हेक्टर (३०.१९ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार २७२ असताना प्रत्यक्षात १ लाख २५ हजार ४४६ हेक्टरवर (१११.७५ टक्के) पेरणी झाली.
त्यात हरभऱ्याचे सरासरी १ लाख १२ हजार १७० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २५ हजार ४३१ हेक्टर (१११.८२ टक्के) पेरणी आहे. करडई, जवस, तीळ, गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी ८९३ हेक्टरवर (२४.५१ टक्के) पेरणी झाली. त्यात करडईची ३ हजार ३७१ पैकी ८४० हेक्टर (२४.९२ टक्के) पेरणी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात तृणधान्यांची ५५ हजार ६७९ पैकी २९ हजार ६६१ हेक्टर (५३.२७ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ पैकी १ लाख ७ हजार ५७७ हेक्टरवर (८९.३७ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १ लाख ७ हजार ४८८ हेक्टर (८९.४६टक्के) पेरणी झाली. गळीत धान्यांची ८४२ पैकी २८७ हेक्टर (३४.०५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात करडईची २०५ पैकी २८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तालुकानिहाय रब्बी ज्वारी
पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी २०००० ८५१९ ४२.५९
जिंतूर १५४४६ १५७५० .१०१.९७
सेलू १७४०७ ८३०० ४७. ६८
मानवत ७५७१ १५८० २०.८७
पाथरी ९६ ०४ ५३२१ ५५.४०
सोनपेठ ६८७६ ३१९६ ४६.४८
गंगाखेड १७०७२ ११९२० ६९.८०
पालम १०९३० ९९८० ९२.३०
पूर्णा ८१.७५ १६३४ १९.९९
हिंगोली १५३४ ५२५ ३४.२१
कळमनुरी ८३० ५३८ ६४.८२
वसमत ६११२ २००० ३२.७२
औंढा नागनाथ २५३२ २९५० ११६.५४
सेनगाव ६८९ ४०३ ५८.४९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.