
Organic Farming कोल्हापूर : येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत सुमंगल लोकोत्सवात (Panchmahabhut Lokotsav) येथील कणेरी कृषी विज्ञान केंद्राने (Kaneri KVK) १२६ पिकांचे एकत्रित सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) प्रात्यक्षिक साकारले आहे.
लोकोत्सवात हे एक आकर्षण बनले आहे. तृणधान्य (Millet), भरडधान्य, डाळवर्गीय पिके, हिरवळीची खते (Green Manure), औषधी वनस्पती, कंदवर्गीय, वनस्पती आधी विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांचा खजानाच येथे उभारण्यात आला आहे.
कणेरी मठ येथे असणाऱ्या देशातील सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राने गेल्या तीन महिन्यांपासून मेहनत घेऊन हे प्रात्यक्षिक उभारले आहे. ते महोत्सवास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आकर्षण बनत आहे. प्रत्येक पिकासाठी अर्धा गुंठ्याचे क्षेत्र घेतले आहे.
एकूण अडीच एकर क्षेत्रावर ही प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. विविध देशी व सुधारित जातींची पिके, कडधान्य, चारा वर्गीय पिके, कंदवर्गीय पिके, हिरवळीची खते, विविध प्रकारची फुलझाडे आदींचा हा विभाग शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
नोव्हेंबरमध्ये या प्रात्यक्षिकांसाठी लागवड करण्यात आली. त्यानंतर अखंडितपणे या पिकांची जोपासना करण्यात आली आहे.
सिद्धगिरी मठाचे सेंद्रिय शेतीत मोठे काम आहे. हाच धागा पकडून सेंद्रिय शेतीचा आधार घेऊन ही पिके वाढवण्यात आली आहेत. पिकांचे व्यवस्थापन करताना गोमूत्र व गोआधारित उत्पादनांचा वापर केला आहे. शंभर टक्के सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा यासाठी वापरल्या.
कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत आदींसह गोमूत्रांच्या फवारण्या वेळोवेळी केल्याने हा प्लॉट दिशादर्शक बनला आहे. कणेरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर, केव्हीकेचे प्रमुख रवींद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञाच्या टीमने हे प्रात्यक्षिक साकारले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.