Department of Health : बदलापुरात आढळले डेंगू चे रुग्‍ण

बदलापुरात डेंगीचे रुग्ण सापडत असून, रुग्ण उपचार घेऊन घरी येईपर्यंतसुद्धा पालिकेला या संदर्भात काहीच माहिती नसल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे.
Department of Health
Department of HealthAgrowon

बदलापूर : बदलापुरात डेंगीचे रुग्ण सापडत असून, रुग्ण उपचार घेऊन घरी येईपर्यंतसुद्धा पालिकेला या संदर्भात काहीच माहिती नसल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे. पालिकेचा आरोग्य विभाग (Department of Health) शहरात आढळणाऱ्या डेंगी रुग्‍णांबाबत अनभिज्ञ असून, आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करण्‍यात येत आहेत.

Department of Health
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा विभागात एकाच घरात दोन महिला व लहान मूल यांना डेंगीची लागण झाली आहे. या तीनही रुग्णांचा रक्ततपासणी अहवाल प्राप्त होऊन चार ते पाच दिवसांचा अवधी लोटला असून, हे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, शहरात साथीच्या रोगांचे रुग्ण सापडत असूनदेखील आरोग्य विभागाला मात्र या संदर्भात माहिती नसल्याचे समोर आले आहे.

अहवाल गुलदस्तात

कुळगाव-बदलापूर पालिकेच्‍या आरोग्य अधिकारी वैशाली देशमुख म्‍हणाल्‍या, की जे रुग्ण खासगी रुग्णालयात आहेत. त्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून, ग्णांचे अहवाल पाठवले जात नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com