Farmer Market : शेतकरी आठवडे बाजार अतिक्रमणाच्या कचाट्यात

शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ विभागीय कार्यालयाने सिंहगड रस्ता फन टाइम थिएटर शेजारी कालव्यालगतच्या जागेत शेतकरी आठवडे बाजारास परवानगी दिलेली आहे.
Farmer Market
Farmer MarketAgrowon

Agriculture Market News पुणे : शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला विक्री (Vegetable Market) करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ विभागीय कार्यालयाने सिंहगड रस्ता फन टाइम थिएटर शेजारी कालव्यालगतच्या जागेत शेतकरी आठवडे बाजारास (Farmer Market) परवानगी दिलेली आहे.

मात्र येथे भरणाऱ्या आठवडे बाजारावर सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाकडून अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना फळ-भाज्या फळे आणि इतर कृषी उत्पादने थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजारास नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आठवडे बाजारासाठी जागा देण्यात आली आहे.

पाटबंधारे विभागास (१२ जानेवारी २०१८) जागेच्या परवानगीसाठीचे पत्र दिलेले आहे. केवळ शासकीय प्रक्रिया बाकी आहे.

Farmer Market
Agricultural Department : कृषी विभागाचा कारभार रिक्त पदांमुळे खिळखिळा

तरीही अधिकारी मोठा लवाजमा घेऊन बुधवारी कारवाईसाठी आले होते. ही कारवाई केली जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी जागेच्या परवानगीबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यास आठवडाभराचा कालावधी दिला आहे.

तसेच परवानगीचे पत्र आणून देण्याचे आश्‍वासन दिले, याबाबत खासदार सुळे यांनीही चर्चा केल्यानंतर बाजार सुरू करता आला.

Farmer Market
Agriculture Subsidy : शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी १५ हजार रुपये अनुदान द्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भूपेंद्र मोरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आठ दिवसांत आठवडे बाजारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फोनवरून सांगितले, की आठ दिवसांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून बाजाराला परवानगी देण्याची आम्ही व्यवस्था करू. त्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली. याबाबत खासदार सुळे या आयुक्तांशी चर्चा करणार आहेत.

- भूपेंद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस

शेतकऱ्यांची तळमळ आम्हाला समजते. आठ दिवसांत त्यांनी परवानगी आणून द्यावी म्हणजे त्यांना येथे व्यवसाय करता येईल. नियमांच्या आधारे आम्ही कारवाई करीत आहोत. शेतकऱ्यांना त्रास देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.

- धम्मानंद गायकवाड, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com