Vegetable Cultivation : प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी पुढाकार घ्यावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकाव्यतिरिक्त शेतात नवे प्रयोग राबवावे. तसेच नगदी उत्पन्न देणाऱ्या फळ व भाजीपाला पिके घेण्यात यावी, यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
Vegetable Cultivation
Vegetable CultivationAgrowon

भंडारा : शेतकऱ्यांनी पारंपरिक धान (Paddy) पिकाव्यतिरिक्त शेतात नवे प्रयोग राबवावे. तसेच नगदी उत्पन्न देणाऱ्या फळ व भाजीपाला पिके (Vegetable Crop) घेण्यात यावी, यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी (Vegetable Cultivation) पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

Vegetable Cultivation
Vegetable Market : नगरमध्ये कोबी, फ्लॉवरची अधिक आवक

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान उत्पादनासोबतच फळबाग व भाजीपाला लागवड करावी याकरिता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांकरिता विविध योजना राबविल्या जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेऊन फळबाग व भाजीपाला लागवडीला सुरुवात केली अशा साकोली व लाखणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या शेतीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देवून पाहणी केली.

Vegetable Cultivation
Vegetable Producer : भाजीपाला उत्पादकांवर ‘अस्‍मानी’

साकोली तालुक्यातील सानगडी येथील अशोक लिचडे यांनी कृषी विभागाच्या योजनेतून ६ एकर शेतीमध्ये रेड ॲपल, बोरची १ हजार २०० झाडे व ५ एकर शेतीमध्ये सीताफळाची २ हजार ८०० झाडे लावली. भंडारा, देवरी, गोंदिया व नागपूर बाजार पेठेत रेड ॲपल, बोर व सिताफळे विक्रीला जात असून लिचडे यांना फळबागेमधून चांगले उत्पन्न मिळत आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या शेतातील डी कंपोजरद्वारे खत निर्मितीची माहिती जाणून घेतली.

लाखणी तालुक्यातील कोलारी (पटाची) येथील मोरेश्वर शिंगणजुडे यांनी कृषी विभागाच्या योजनेतून ८ एकर शेतीमध्ये केळी, पपई व टरबूज ची लागवड केली आहे. भंडारा बाजारपेठेत फळे विक्रीला जात असून शिंगणजुडे यांना फळबागेमध्ये चांगले उत्पन्न मिळत आहे. आंतरपिकामध्ये अद्रक, लसूण व इतर भाजीपाला पिके ते घेत असतात.लाखणी तालुक्यातील पालांदूर येथील शंकर नंदनवार यांनी कृषी विभागाच्या योजनेतून ६ एकर शेतीमध्ये भाजीपाला लागवड केली आहे. त्यामध्ये कारले, टमाटर, लवकी, काकडी, भेंडी, फूल कोबी, पता कोबीचे उत्पादन होत असून त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत आहे.

रोज १८ ते २० लोकांना ते शेतामध्ये रोजगार उपलब्ध करून देतात. नंदनवार यांची तीन सुशिक्षित मुले असून तीपण त्यांच्या सोबत शेती करतात. अशोक लिचडे, मोरेश्वर शिगणजुडे व शंकर नंदनवार यांनी त्यांच्या गावातील व बाजूच्या इतर शेतकऱ्यांना फळबाग व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी त्यांना सांगितले.

लाखणी तालुक्यातील कन्हेरी येथील भास्कर टिचकुले यांनी २ एकर शेतीमध्ये मोहगणीची ८८८ झाडे लावली. ही झाडे १० वर्षांत ८० मीटर उंच व खोडाची गोलाई १ मीटरपर्यंत होते. मोहगणीच्या झाडांच्या बियांपासून औषधी निर्मिती केली जाते व त्याचे लाकूड जहाज बांधणी, वाद्य तयार करणे व फर्निचर तयार करण्यासाठी वापरले जाते. पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी टिचकुले यांच्या शेतात एक झाड लावले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com