Farmers Protest : घनसावंगी तहसीलवर शेतकऱ्यांचा ‘बिऱ्हाड मोर्चा’

तालुक्यात या वर्षी अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यापोटी नुकसानभरपाई म्हणून सरसकट मदत द्यावी.
Crop Damage
Crop DamageAgrowon

घनसावंगी, जि. जालना : तालुक्यात या वर्षी अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य (Wet Drought & Cloudburst like Rain) पावसामुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. त्यापोटी नुकसानभरपाई म्हणून सरसकट मदत द्यावी. तसेच पीकविमा (Crop Insurance) मिळवा यासह अन्य मागण्यांसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या (Yuva Shetkari Sangharsh Samite) वतीने तहसील कार्यालयावर मंगळवारी (ता. १८) बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला.

Crop Damage
Paddy Crop Damage : लांजा तालुक्यात भातशेतीचे नुकसान

घनसावंगी तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे व गत पंधरवड्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या घास निगर्साने हिरावून घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन, मूग, ऊस व मोसंबी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनामा न करता सरसकट नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे. तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांच्या पीकविमाही मंजूर करण्याबाबत संबंधित पीकविमा कंपनीस सूचना देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी संत रामदास महाविद्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

तहसील कार्यालयात मोर्चा आल्यानंतर नायब तहसीलदार सतीश सुपे यांना पिकांचे पंचनामे न करता सरसकट एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांची दिवाळी गोड करावी, तालुक्यातील बाकी राहिलेल्या महसुल मंडळांना मंजूर विमा अग्रिम वाटप करावा, सदोष पर्जन्यमापक यंत्रणेचे पावसाचे आकडे मागे घ्या व ओला दुष्काळ जाहीर करा,

प्रत्येक शेतकऱ्याचा पीकविमा सर्वे न करता शासन निर्णयाप्रमाणे सरसकट पीकविमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे १०० रुपयेमध्ये देऊ केलेली रेशन किटही मोफत देण्यात यावी. आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com