Silk : ‘महा रेशीम अभियाना’ साठी शेतकऱ्यांनी संपर्क करावा

जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नवीन तुती क्षेत्र नोंदणीचा कार्यक्रम १५ डिसेंबरपर्यंत असेल.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात महारेशीम (Silk) अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नवीन तुती क्षेत्र नोंदणीचा कार्यक्रम १५ डिसेंबरपर्यंत असेल. इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे यांनी केले.

Silk Farming
Crop insurance : विम्याची हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भूसुधार योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भूधारक सीमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येईल.

योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षांत अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनेसाठी ६८२ मनुष्य दिवस व किटक संगोपन गृहासाठी २१३ दिवस अशा एकूण ८९५ दिवसांची मजुरी देण्यात येते. स्वत: मजूर म्हणून स्वत:च्या शेतात काम करणे आवश्यक आहे.

Silk Farming
Agro Idol: स्वत:च स्वत:चे आयडॉल बना

‘‘लाभार्थी निवडताना इच्छुकांकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी. नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय असावी. सर्व खर्च वजा जाता एकरी वार्षिक किमान दीड लाख रुपये उत्पन्न निश्चित मिळेल. जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी वाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठमाही सिंचनाची सोय व खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, ५६४ ई वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहूपुरी, कोल्हापूर येथे संपर्क साधावा’’, असेही कांबळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com