
अकोला ः गेल्या दोन दिवसांपासून या विभागात सतत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) बनलेले असून दिवसभर धुक्याची चादर (Foggy Weather) पसरलेली दिसून येत आहे. या वातावरणाचा काही पिकांना फटका बसण्याची चिन्हे वाढली आहेत. प्रामुख्याने कांदा पिकाचे नुकसान (Onion Crop Damage) होत आहे.
सततच्या ढगाळ वातावरणाशिवाय गारवा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी दिवसाही शेकोट्या पेटवल्या जात आहेत. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदू असे वातावरण अनुभवता येत आहे.
वातावरणात धुक्याची चादर पसरल्याने रब्बी पिकावर परिणामाची चिन्हे आहेत. या वातावरणाने पिकांवर किडीची वाढ होऊ शकते. हरभरा, तूर, गहू या पिकांवर धुक्याचा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.
सध्या कोरडवाहू पट्ट्यात तुरीचे पीक शेंगांमध्ये दाणे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. या वातावरणामुळे शेंगांमध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला. याचा परिणाम उत्पादन तसेच तुरीच्या दर्जावरही होऊ शकतो.
सध्या जिल्ह्यात कांद्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या पातीचे शेंडे अचानक वाळत आहेत. यामुळे पीकवाढीवर परिणाम होऊ शकतो. सतत वातावरण ढगाळ असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही होऊ शकतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.