Irrigation : ‘चित्री’चे पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून

चित्री व तालुक्यातील अन्य पाटबंधारे प्रकल्पातील पाणी नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. शेतकऱ्यांची मागणी व गरजेनुसार पाटबबंधारे प्रकल्पातून पाणी सोडले जाईल.
Irrigation
IrrigationAgrowon

आजरा ः चित्री व तालुक्यातील अन्य पाटबंधारे प्रकल्पातील (Water Project) पाणी नियोजनाचा (Water Planning) आराखडा तयार केला आहे. शेतकऱ्यांची मागणी व गरजेनुसार पाटबबंधारे प्रकल्पातून पाणी सोडले (Irrigation) जाईल. चित्री प्रकल्पातून १५ जानेवारीला पाणी सोडले जाणार असून २१ दिवसांचे आवर्तन आहे. पाच आवर्तने प्रस्तावित असल्याचे आजरा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

Irrigation
Koradi Irrigation : कोराडी सिंचन प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड

यंदा परतीचा पाऊस लांबला. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज भासलेली नाही. पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा पुरेसा आहे. पण यंदा प्रकल्पात पाण्याची आवक कमी आहे. सध्या चित्री प्रकल्पात १८१० दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे.

Irrigation
Irrigation Scheme : वैयक्तिक शेततळ्यांबाबत प्लॅस्टिक फिल्म नोंदणीचे बंधन

अन्य प्रकल्पांतही पुरेसा पाणीसाठा आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही नियोजन केले आहे. काही प्रमाणात पाणीपातळी कायम राहण्यासाठी प्रकल्पातून पाणी सोडले होते. जून अखेरपर्यंत आजरा-गडहिंग्लज तालुक्यांना मिळेल इतके पाणी चित्रीमध्ये शिल्लक आहे.

टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे. ‘चित्री’तून पहिले आवर्तन १५ जानेवारीला केले जाणार आहे. त्यानंतर पाच आवर्तने होतील. याचा आराखडा निश्चित केला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणी नियोजन केले आहे. कालवा समितीतील बैठकीत आलेल्या सूचना व चर्चेनुसार यामध्ये बदल केला जाईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. ‘चित्री’वर साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com