Bhima River : सोलापूर जिल्ह्यात भीमा, सीना नदीला पूरस्थिती

धरणातून पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, दुसरीकडे सीना-कोळेगाव प्रकल्पातूनही सीना नदीत पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील भीमा आणि सीना या दोन्ही प्रमुख नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Bhima River
Bhima River Agrowon

सोलापूर ः पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे (Heavy Rainfall) सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. परिणामी, धरणातून पुढे भीमा नदीत (Bheema River) पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, दुसरीकडे सीना-कोळेगाव प्रकल्पातूनही सीना नदीत पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील भीमा आणि सीना या दोन्ही प्रमुख नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Bhima River
River Floods : कृष्णा,भीमा महापूर अभ्यास समितीस पुन्हा मुदतवाढ

गेल्या चार-पाच दिवसांपासून उजनी धरणाच्या वरच्या बाजूच्या पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ही सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. आता या धरणातून उजनीकडे पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

Bhima River
Kokan Rivers : कोकणातील नद्यांची नैसर्गिक रचनाच बदलली

बुधवारी (ता. १२) दौंडकडून उजनीमध्ये सुमारे ७३०५ क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. पाण्याचा विसर्ग अगदीच किरकोळ आणि कमी असला, तरी त्यात सातत्य आहे. त्यामुळे धरण आधीच शंभर टक्के भरलेले असताना, या पाण्यामुळे पाणीपातळीत मात्र आणखी वाढ होत आहे.

पाण्याच्या या विसर्गामुळे पुढील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी उजनीतून भीमा नदीत सुमारे २० हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरुन वाहत आहे.

दुसरीकडे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने सीना-कोळेगाव प्रकल्पातूनही सीना नदीत जवळपास ३० हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सीना नदीत सोडण्यात येत आह. त्यामुळे जिल्ह्यातील भीमा आणि सीना या दोन्ही नद्यांना सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com