Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc ElectionAgrowon

Khandesh APMC Election : धुळे, जळगावात जागांचा फॉर्म्युला निश्चित होईना

खानदेशात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव व धुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजप व शिंदे गटात वेगवान हालचाली सुरू आहेत.

Jalgaon News खानदेशात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव (Jalgaon APMC) व धुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC Election) भाजप व शिंदे गटात वेगवान हालचाली सुरू आहेत. जळगावात शिंदे गटाची किंवा शिवसेनेची ताकद अधिक असताना भाजपला सहा जागा देण्याची तयारी सेनेने केली आहे.

तर धुळ्यात भाजपने काँग्रेसला शह देण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. पण जागांचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. धुळ्यात भदाणे गटाला भाजप जवळ करण्याच्या प्रयत्नात आहे. तर जळगावात शिंदे गटाने भाजपला सोबत घेण्यासंबंधी रणनीती आखली आहे.

Jalgaon Apmc Election
Marathwada Apmc Election : बाजार समिती निवडणुकीची रंगत वाढली, आता लक्ष उमेदवारी अर्ज माघारीकडे

जळगाव बाजार समितीत शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. मराठा, कोळी, लेवा पाटीदार, गुर्जर या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासंबंधी नेत्यांचा कस लागत आहे. कारण स्पर्धा अधिक आहे. जागा कमी व इच्छुक अधिक, अशी स्थिती आहे. त्यात महाविकास आघाडीमध्ये शिंदे गटातील नाराज मंडळी जाऊन पोचल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे.

धुळ्यात भाजप-भदाणे गटात वाटाघाटी सुरू

धुळे जिल्ह्यात सर्वाधिक चुरशीच्या ठरणाऱ्या धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींतर्गत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अशात बोरकुंड (ता. धुळे) येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी तिसऱ्या पर्यायाची साद घालत रंगत वाढविली आहे.

Jalgaon Apmc Election
Nandurbar Apmc Election Update : नंदुरबारात सहा बाजार समित्यांसाठी छाननीअंती ४६३ अर्ज वैध

त्यात भाजप व भदाणे गटाने एकत्रित पॅनल दिले तर आमदार पाटील यांना अधिक क्षमतेने शह देता येईल, अशा विचारातून भाजप व भदाणे गटात जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. धुळे बाजार समितीवर माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आमदार कुणाल पाटील यांचा एकछत्री अंमल राहिला आहे.

त्यांना समितीच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी पराभूत करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु पाटीलद्वयींच्या सत्तेला अद्याप कुणी भेदू शकलेले नाही. या स्थितीत आमदार पाटील यांना शह देण्यासाठी भाजपने क्षमतेने रिंगण्यात उतरण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या पक्षाचे धुळे तालुक्यातील सर्व नेतेमंडळी, प्रमुख पदाधिकारी एकवटले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com