Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी जोरात

अकोला जिल्ह्यात सरपंच पदाच्या २६६ जागांसाठी तब्बल ९४० उमेदवार रिंगणात असून, २,०७४ सदस्य पदांसाठी सुमारे ३,९१७ उमेदवार रिंगणात आहेत.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon

अकोला ः जिल्ह्यात सरपंच पदाच्या (Sarapanch) २६६ जागांसाठी तब्बल ९४० उमेदवार रिंगणात असून, २,०७४ सदस्य पदांसाठी सुमारे ३,९१७ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर हे निवडणुकीचे (Gram Panchayat Election) चित्र स्पष्ट झाले असून ग्रामीण भागात निवडणूक रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे.

Gram Panchayat Election
Jalgaon Dairy Election : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीसाठी सात मतदान केंद्रे

ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी रविवारी (ता. १८) निवडणूक होत आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र समोर आले.

Gram Panchayat Election
Gujarat Election Result : गुजरातेत भाजपच; हिमाचलमध्ये काँग्रेस

माघार घेतल्यानंतर सरपंचाच्या २६६ पदांसाठी ९४०, तर सदस्यांच्या दोन हजार ७४ जागांसाठी तीन हजार ९१७ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी (ता. ११) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर मंगळवारी (ता.२०) मतमोजणी होणार आहे.

अशी आहे जागांची संख्या

तालुका सरपंच जागा सदस्य जागा

तेल्हारा २३ १९१

अकोट ३७ ३०५

मूर्तिजापूर ५१ ३९१

अकोला ५४ ४०४

बाळापूर २६ १९८

बार्शीटाकळी ४७ ३५९

पातूर २८ २२६

एकूण २६६ २०७४

रिंगणातील उमेदवार

तालुका सरपंचपद सदस्य

तेल्हारा ७१ ३६५

अकोट १०९ ५८०

मूर्तिजापूर १९२ ६८०

अकोला १९२ ८०६

बाळापूर १०६ ३६१

बार्शीटाकळी १६८ ६८७

पातूर १०२ ४३८

एकूण ९४० ३९१७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com