Hailstorm : पन्हाळे परिसरात गारपिटीचा तडाखा

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उन्हाळी कांदा लागवडी, काढणीला आलेला गहू, द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान झाले. तसेच खळ्यावर रचलेले भात, नागली आदी मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nashik News : जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात शुक्रवारी (ता. १७) पावसाने जोरदार (Heavy Rain) हजेरी लावली. प्रामुख्याने पन्हाळे गावाच्या परिसरात गारपिटीचा (Hailstorm) मोठा तडाखा बसला आहे.

तर रायपूर, निंबाळे, भारतनगर, भडाणे, निमोण परिसरात जोरदार पाऊस झाला. कसमादे पट्ट्यातील सटाणा, कळवण, नांदगाव, मालेगाव, तालुक्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटाने जोरदार हजेरी लावली.

या भागात प्रामुख्याने गहू, लेट खरीप व रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याला (Onion Crop Damage) मोठा फटका बसला आहे. जोरदार झालेल्या गारपिटीमुळे शेतात अक्षरशः गारांचा खत साचला होता. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर गारा पडल्याचे दिसून आले.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उन्हाळी कांदा लागवडी, काढणीला आलेला गहू, द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान झाले. तसेच खळ्यावर रचलेले भात, नागली आदी मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गत मॉन्सूनमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे.

Crop Damage
Crop damage Compensation : नुकसानग्रस्तांना हेक्टरी २५ हजार मदत द्या

त्यामुळे प्रमुख कांदा उत्पादक पट्टा असलेल्या चांदवड तालुक्यात या वर्षी लेट खरीप व उन्हाळ कांद्याच्या लागवडी लांबणीवर गेल्या आहेत.

त्यामुळे सध्या लेट खरीप कांदा काढणी सुरू होती, तर पुढील पंधरा दिवसांत उन्हाळ कांदा हा काढणीवर आला होता.

काढणीस आलेले गहू या गारपिटीमुळे आडवे तिडके झाले आहे. वादळी वारा असल्याने या ठिकाणी मोठे क्षेत्र प्रभावी झाल्याचे दिसून येत आहे.

सटाणा तालुक्यातील पिंपळदर, दाने, तरसाळी, मुंजवाड, खमताने, जुने व नवे निरपूर, तिळवण, अजमीर सौंदाणे, लोहोणेर, ठेंगोडा, डांगसौंदाणे, केळझर, दहिंदुले, अंतापूर, मांगीतुंगी, हरणबारीसह विंचुरे, मुल्हेर, जाखोड, नरकोळ विरगाव आदी परिसरांत दुपारी चारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारा पडल्या.

Crop Damage
Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने शेकडो हेक्टरवर नुकसान; मदत कधी मिळणार?

कळवण तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने एक तास विजांसह हजेरी लावल्याने शेतामधील पिकांचे मोठ्या गहू, कांदा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अभोणा परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास वादळीवारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.

नांदगाव तालुक्यात शहर व परिसरातील गंगाधरी, दहेगाव बाणगाव, फुलेनगर आदी विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लावली. दहेगाव व बाणगावला गारा पडल्या. तालुक्यातील हिरेनगर शिवारातील शेतकरी बापू पल्हाळ यांच्या गाईच्या वासरावर वीज पडल्याने ते दगावले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com