Dr. Sharad Gadakh : रिसोडच्या कृषी महाविद्यालयातर्फे कुलगुरू डॉ. गडाख यांचा सत्कार

कृषी महाविद्यालयाच्या वतीने संकलित केलेल्या संत्रा पिकावरील सायट्रस सीला किडीचे व सायट्रस ग्रीनिंग या रोगाचे व्यवस्थापन या घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले.
Teacher Reception
Teacher ReceptionAgrowon

रिसोड, जि. वाशीम ः Teacher Reception : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. शरद गडाख (Vice-Chancellor Dr. Sharad Gadakh) यांचा येथील कृषी महाविद्यालयातर्फे (Agriculture college) व्यवस्थापकीय विश्वस्त चैतन्य देशमुख यांनी सत्कार (Satkar) केला. संत्रा मेळाव्याच्या निमित्ताने या भागात डॉ. पहिल्यांदाच आले होते.

कृषी महाविद्यालयाच्या वतीने संकलित केलेल्या संत्रा पिकावरील सायट्रस सीला किडीचे व सायट्रस ग्रीनिंग या रोगाचे व्यवस्थापन या घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख होते. आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, ‘पंदेकृवि’चे उद्यान विद्या विभागप्रमुख डॉ. शशांक भराड, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. योगेश इंगळे, सहयोगी प्रा. डॉ. उज्वल राऊत, संजय उकळकर, जिल्हा अधिक्षक शंकर तोटावार, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे आदी उपस्थित होते.

Teacher Reception
Teacher Transfer : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू

डॉ. गडाख यांनी कृषी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याबद्दल तसेच महाविद्यालयाच्या इतर पूरक उपक्रमांसहित कृषी विस्ताराच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या वेळी प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी गोपाल बोरकर यांचा प्राचार्य डॉ. आशिष आपतुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com