Self Employment Opportunities : वाडी कार्यक्रमातून रोजगार संधीत वाढ ः भरत काकडे

‘बाएफ’ संस्थेचे मिशन हे ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे.
Self Employment Opportunities : वाडी कार्यक्रमातून रोजगार संधीत वाढ ः भरत काकडे

पुणे ः ‘बाएफ’ संस्थेचे मिशन हे ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी स्वयंरोजगाराच्या (Self Employment) संधी निर्माण करणे आहे. संस्थेने वाडी प्रकल्पाच्या माध्यमातून शेती-फळझाडे-वनीकरणावर आधारित कार्यक्रम विकसित केला. यातून देशभरातील दोन लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीवर वृक्ष लागवड करून उपजीविकेच्या संधी निर्माण केल्या आहेत.

Self Employment Opportunities : वाडी कार्यक्रमातून रोजगार संधीत वाढ ः भरत काकडे
Crop Damage Compensation : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीअभावी मदतच मिळेना

वाडी कार्यक्रमाद्वारे प्रति हेक्टरी सुमारे २३ टन कर्ब स्थिरीकरण केले जाते. त्यामुळे वाडी कार्यक्रम हा सर्वसमावेशक कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन बाएफ विकास संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त भरत काकडे केले.

इजिप्तमध्ये सुरू असलेल्या ‘कोप-२७’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमधील चर्चासत्रामध्ये काकडे यांनी ‘जमिनीची धूप थांबवणे आणि जमीन सुधारणेमध्ये बाएफ संस्थेच्या वाडी कार्यक्रमाचा प्रभाव’ या विषयाबाबत सादरीकरण केले. परिषदेमध्ये सदाशिव निंबाळकर, योगेश सावंत, रावसाहेब कोते हे देखील सहभागी झाले होते.

या वेळी ते म्हणाले, की संस्थेतर्फे विविध राज्यांतील ग्रामीण भागात नाबार्डच्या साह्याने वाडीसोबत अन्न सुरक्षा, वनीकरण, दुग्ध व्यवसाय, मृदा आरोग्याविषयीच्या विविध उपक्रम लोकसहभागातून यशस्वी झाले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com