Rain Update
Rain Update Agrowon

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी

हवामान विभागाने राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार वातावरणात मोठे बदल होत असून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

Pune Rain Update पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार आहे. यामुळे मंगळवारी (ता.१४) सायंकाळी पूर्व हवेलीसह तुरळक ठिकाणी हलका पाऊस (Rainfall) पडला. बुधवारी (ता.१५) सकाळपासूनच हवामान ढगाळ असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे.

शेतात काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून पिकांची काढणी करण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.

हवामान विभागाने राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार वातावरणात मोठे बदल होत असून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

त्यातच काही दिवसांपासून थंडी कमी होऊन उन्हाचा पारा वाढत आहे. त्यातच पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Rain Update
Rain Update : अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत अवकाळी पावसाची हजेरी

अवकाळी पावसाचा अंदाज दिल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आहे. सायंकाळी पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे.

या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळीचा पाऊस झाला. या पावसामुळे रब्बीची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली असून फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरीच्या दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टरपैकी एक लाख ७३ हजार ७५१ हेक्टर म्हणजेच ७६ टक्के पेरणी झाली आहे.

सध्या पिके काढणीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी काढणी झाली आहे. तर काही ठिकाणी ती सुरू आहे. भाजीपाला पिकांना फटका बसून उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Rain Update
Rain Update : राज्यात पाऊस पडणार?

हवामान विभागाने पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हरभरा, गहू काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

- सुभाष काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.

सध्या अनेक ठिकाणी द्राक्षे काढणीच्या अवस्थेत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. अनेक शेतकरी द्राक्षाची काढणी करून विक्री करू लागले आहेत.

- जितेंद्र बिडवाई, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com