Maharashtra Politics:महाविकास सरकारची उद्या अग्निपरीक्षा: बहुमत चाचणी घेण्याचे राज्यपालांचे आदेश

महाविकास आघाडी सरकार राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल, असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
Koshyari &Thackeray
Koshyari &ThackerayAgrowon

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhgat singh Koshyari) यांनी उद्या (३० जून) विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी विधानसभा सचिवांना त्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. (Koshyari Orders To Floor Test)

मंगळवारी रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकारने बहुमत गमावले असून राज्यपालांनी सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र दिले होते. त्यानतंर वेगवान घडामोडी घडून राज्यपालांनी सरकारला बहमुत सिध्द करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)दाद मागेल, असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी सांगितले. राज्यपालांच्या भूमिकेवर राऊत यांनी टीका केली. ``राज्यपालांनी ज्या प्रकारे बहुमत चाचणीचे आदेश काढले हे तर राफेल विमानापेक्षा जास्त वेगाने काढले. गेल्या अडीच वर्षापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची फाईल रखडवली. अशा प्रकारे भाजप राज्यघटनेच्या चिंधड्या करत आहे. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात असताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश कसे दिले,`` असे राऊत म्हणाले.

Koshyari &Thackeray
शेतकऱ्यांसाठी मॉन्सून आणि सरकारही नॉट रिचेबल

राज्यपालांच्या निर्णयानंतर गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याला जाणार असल्याचे समजते. भाजपने कालच सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याच्या सुचना दिल्या होत्या. कॉंग्रेसनेही आज सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी पक्षाची बैठक सुरू आहे.

काय आहे राज्यपालांच्या पत्रात?

१. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती अस्थिर असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेच्या ३९ आमदारांनी घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिध्द होते आहे.

२. यापार्श्वभूमीवर सात अपक्ष आमदारांचा २८ जून रोजी राजभवनला ईमेल आला आहे. त्यामध्ये सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लवकरात लवकर बहूमत चाचणी सिध्द करणे आवश्यक आहे.

३. विरोधी पक्षनेत्यांनी २८ जून रोजी माझी भेट घेतली. मला राज्याच्या राजकीय स्थितीची माहिती दिली. त्यांनी पत्रही दिले असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे बहुमत नसल्याचे म्हटले आहे. राजकीय घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

४. मुंबईसह राज्याच्या काही भागात ३९आमदारांविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आमदारांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवालाही धोका आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहूमत सिध्द करायला हवे, असे माझे मत झाले.

५. मुख्यमंत्र्यांनी ३० जून रोजी विधीमंडळात बहुमत सिध्द करावे.

Koshyari &Thackeray
शिंदे आणि समर्थकांना परत बोलवा: उच्च न्यायालयात याचिका दाखल

बहूमत चाचणीसाठी राज्यपालांचे निर्देश -

१. विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जून रोजी सकाळी ११ वाजता होईल. त्यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहूमत सिध्द करावे लागेल.

२. काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे विधानभवन परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करावी.

३. बहूमत चाचणी प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करावे.

४. प्रत्येक सदस्याला जागेवर उभे राहण्यास सांगून सदस्य मोजणी करावी.

५. कोणत्याही कारणास्तव सभागृहाचे कामकाज तहकूब करू नये. ३० जून रोजीच मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी.

६. अविश्वास ठराव प्रक्रियेचे स्वतंत्रपणे व्हिडीओ शुटींग करून माझ्याकडे सादर करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com