Weather Effect : पहाटे हिवाळा, दुपारी उन्हाच्या झळा

शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अतिरिक्त कष्ट घ्यावे लागत आहे.
Change Weather
Change WeatherAgrowon

Tembhurani Weather News : पहाटे हिवाळा आणि दुपारी उन्हाच्या झळा असे वातावरण सध्या आहे. त्यामुळे शेतशिवारातील मका पिकावर (Maize Crop) या बदलत्या वातावरणाचा (Change In Weather) परिणाम सध्या होऊ लागला आहे.

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात गेल्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला. त्यामुळे विहिरी पाण्याने तुडुंब भरले आहेत.यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम, रब्बी हंगाम (Rabi Season) यानंतर उन्हाळ्यातही मका पीक घेण्याचे नियोजन केले.

Change Weather
Onion Cultivation : मका, कांद्याचे पीक बहरले

काही शेतकऱ्यांनी उन्हाळी मकाची ही मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. परंतु सद्यःस्थितीत पहाटे हिवाळा तर दुपारी उन्हाच्या झळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळी मका पिकाला फटका बसत आहे.

शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अतिरिक्त कष्ट घ्यावे लागत आहे. याशिवाय इतर पिकांवरही बदलत्या वातावरणाचा परिणाम जाणवत आहे.

शेतशिवारात सद्यःस्थितीत मकाचे पीक डोलत आहे. मात्र उन्हामुळे पिके सुकत आहेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस पिकाला पाणी द्यावे लागत आहे.
संतोष पवार, शेतकरी, टेंभुर्णी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com