Buldhana Crop Damage Update: संग्रामपुरातील कांद्याला अवकाळीचा फटका

Kanda Damage : यंदा आधीच कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच गेले काही दिवस सतत या भागात अवकाळी पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले.
Onion Crop Damage
Onion Crop DamageAgrowon

Unseasonal Rain : यंदा आधीच कांद्याला भाव (Onion Rate) नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच गेले काही दिवस सतत या भागात अवकाळी पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान (Crop Damage) झाले. निरोड येथील अनंता अवचार यांचा दोन एकरांतील कांदा जमिनीतच सडल्याचे समोर आले आहे.

दरवर्षी कांद्याची लागवड करून अवचार हे चांगले उत्पादन मिळवत असतात. यंदा त्यांनी दोन एकरांत लागवड केलेली आहे. हा कांदा काढणीसाठी तयार झाला होता.

Onion Crop Damage
Crop Damage Compensation : अवकाळी, गारपीटीच्या अनुदानाची प्रतीक्षा

अशातच या भागात मागील काही दिवसांत सतत अवकाळी पाऊस झाल्याचा फटका बसला. संग्रामपूर तालुक्यातील निरोड, चांगेफळ, निवाणा तसेच इतर गावांत कांद्याची लागवड दरवर्षी होत असते.

Onion Crop Damage
Crop Damage : कळंबीत ६०० एकरावरील पिके करपली

या वर्षी कांद्याला गेल्या अनेक दिवसांपासून दर मिळत नसल्याने उत्पादक चिंतातूर बनलेले होते. आता कांद्याचे पीक काढणीला तयार झाले होते. शेतकऱ्यांनी पीक काढणीला सुरुवात केली असून, अवचार यांच्या दोन एकरांतील कांद्याचे पीक पूर्णतः खराब झाले. कांदे जमिनीतच सडल्याचे समोर आल्याने त्‍यांना मोठा धक्का बसला.

कांद्याची काढणी सुरू करण्यापूर्वीच संपूर्ण शेतातील पीक जमीनदोस्त झाले. पात गळून पडली. कांदे काढून बघितले असता ते सडलेले दिसून आले.

यामुळे आजवर पीक उत्पादनासाठी केलेला हजारो रुपयांचा खर्चही निघणार नसल्याने आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. अशाच प्रकारचे नुकसान या भागात आणखी काही शेतकऱ्यांचे झाल्याचे समोर येऊ लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com