Unseasonal Rain : आभाळ फाटलेय, सरकार कुठेय?

सात दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. गारपिटीमुळे शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsAgrowon

बाळासाहेब पाटील

Maharashtra Budget Session 2023 मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे, सारे आभाळ फाटलेय, खुल्या आभाळाखाली व्यवसाय करणारा एकमेव शेतकरी (Farmer In Crisis) वर्ग आज संकटात असताना सरकार कुठे आहे? पंचनामे करायला सरकारी कर्मचारी नाहीत, सरकार केवळ पोकळ आश्वासने देतेय, या अस्मानी संकटाचे सरकारला (natural Calamity) गांभीर्य नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाने सरकारवर सोमवारी (ता. २०) हल्लाबोल केला.

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही, असा आरोप करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या शेतीच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला.

सात दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. गारपिटीमुळे शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. अध्यक्षांनी सरकारला आदेश काढावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Ajit Pawar News
Grape Crop Damage : कासेगावात सात हजार एकरांवरील द्राक्षे संकटात

गारपिटीमुळे राज्यात आठ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय.

गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे. संप सुरू आहे. पंचनामे करायला कोण नाही. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला.

महसूल नियमानुसार आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि वाटप सुरू करावे. आजच्या आज उपाययोजना करावी. तत्काळ निर्णय करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Ajit Pawar News
Crop Damage : गारपिटीने द्राक्ष बागांसह कांदा पिकाची दैना

आभाळ फाटलेय, मदत करा

धनंजय मुंडे यांनीही अवकाळीचा मुद्दा उपस्थित केला. वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपीट बरसते आहे, मराठवाड्यात ८ जणांचा मृत्यू झाला, अनेक जनावरे दगावली, सुमारे ६२ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले, सरकारने पंचनाम्यांच्या नावाने आदेश दिले पण संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास नकार दिला, काही ठिकाणी पंचनामे करत आहेत मात्र तलाठी किंवा कोणताही कर्मचारी त्यावर सह्या करायला तयार नाही.

Ajit Pawar News
Crop Damage : वादळी पाऊस, गारांचा खच, पिकांच्या नुकसानीत भर

त्यामुळे पंचनाम्यांच्या नावाने वेळ काढण्यापेक्षा मंडळनिहाय सर्व्हे करून ते ग्राह्य धरून तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

सुनील केदार, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली. सरकारच्यावतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंचनामे गतीने सुरू असल्याचे सांगितले.

मात्र, यावर समाधानी आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यानंतर सभात्याग केला. दरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधक या प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

नुकसानीचे फोटो पाठवायचे कुणाला? : अनिल देशमुख

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठविण्याचे आवाहन केले. मात्र, हे मोबाईल क्रमांक बंद आहेत. त्यावर फोटो पाठवता येत नाहीत, चुकून फोटो पाठवले गेले तर ते कुणी पाहत नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांनी केला. जर मोबाईल क्रमांकच सुरू नसतील तर ते जाहीर करू नयेत. मोबाईल क्रमांक बदलून द्यावेत, अशी मागणी केली.

पायऱ्यांवर निदर्शने

आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे...गारपिटग्रस्तांना नुकसान द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा...ईडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे... ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन विधानभवनात प्रवेश केला आणि पायऱ्यांवर ठाण मांडत जोरदार निदर्शने केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com