Paddy Sowing : विठ्ठलवाडा येथे पेरीव धानाचा प्रयोग यशस्वी

पूर्व विदर्भातील धानपट्ट्यातही आता प्रयोगशीलता रुजू लागली आहे. विठ्ठलवाडा (ता. गोंडपिंपरी) येथील बालाजी पिंपळकर यांनी त्या अंतर्गत पेरीव धानाचा प्रयोग केला.
Paddy Sowing | Paddy Productivity
Paddy Sowing | Paddy Productivity Agrowon

Chandrapur: पूर्व विदर्भातील धानपट्ट्यातही (Paddy Belt) आता प्रयोगशीलता रुजू लागली आहे. विठ्ठलवाडा (ता. गोंडपिंपरी) येथील बालाजी पिंपळकर यांनी त्या अंतर्गत पेरीव धानाचा (Paddy Sowing) प्रयोग केला. या माध्यमातून गेल्यावर्षीच्या एकरी १२.६ क्‍विंटलवरुन यंदा १३.८ क्‍विंटलची उत्पादकता (Paddy Productivity) मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. सिंदेवाही संशोधन केंद्राचे धान ब्रिडर गौतम शामकुंवर यांनी देखील या शक्‍यतेस दुजोरा दिला आहे.

Paddy Sowing | Paddy Productivity
Paddy MSP : शेतकऱ्यांचा भात हमीभावाने घेण्याची मागणी

पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत भाताची लागवड होते. या पिकाखालील मोठे क्षेत्र आहे. धानाची रोपवाटिका (पर्ऱ्हे) तयार करून शेतकरी त्याची लागवड करतात. यामध्ये मजुरांची अधिक गरज भासत असल्याने उत्पादकता खर्च वाढतो. त्या पार्श्‍वभूमीवर धान पेरणी यंत्राद्वारे लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे.

Paddy Sowing | Paddy Productivity
Paddy Farming : भाताच्या विविध वाणांची लागवड करणारे गाव

विठ्ठलवाडा येथील बालाजी पिंपळकर यांनी कृषी सहाय्यक विलास रसाळे यांच्या मार्गदर्शनात यंदा पहिल्यांदाच पेरणी केली. त्यासाठी २५ मे पासून जमिनीची मशागत सुरु केली. ७ जूनला यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली. ‘‘पारंपरिक पद्धतीत एकरी २० किलो तर यामध्ये केवळ दहा किलो बियाणे लागते.

१२०० रुपये तास चिखलणी, ६००० रुपये प्रतिएकर रोवणीचा खर्च पारंपरिक पद्धतीत होतो. त्यातच मजूर वेळेवर उपलब्ध न झाल्यास रोपांचे वय वाढते. दहा ते बारा दिवस आधीच धान परिपक्‍व होते. रब्बीसाठी जमीन चांगली उपलब्ध होते. उगवणपूर्व तणनाशकाचा वापर केल्यास कमी खर्चात तणनियंत्रण शक्‍य होते आणि उत्पादन हमखास मिळते’’, असे तज्ज्ञ गौतम शामकुंवर यांनी सांगितले.

पोंभूर्णा तालुक्‍यात शेतकऱ्यांना अनुदानावर पेरणी यंत्र मिळाले आहे. त्यांच्याकडून माहिती घेत यावर्षी प्रयोग केला. भाडेतत्वावरील या मशिनवर १४०० रुपये प्रतितास या प्रमाणे त्यावर खर्च झाला. एका तासाला दीड ते पावणेदोन एकर पेरणी होते. धानाचा दर २३७५ रुपये प्रतिक्‍विंटल आहे. गेल्यावर्षी एकरी १२.६, तर यावर्षी १३.८ अशी उत्पादकता मिळाली.

- बालाजी पिंपळकर, शेतकरी, विठ्ठलवाडा.

पूर्वी पूर्व विदर्भात पेरणीकामी यंत्र नव्हते. त्यामुळे पर्ऱ्हे टाकून पुनर्लागवड होत होती. आता यंत्राची उपलब्धता आणि प्रसार यामुळे शेतकरी यंत्र वापरत आहेत. हेक्‍टरी २५ ते ७५ किलो याप्रमाणे बियाणे दर आहे. पंजाबमध्ये एकरी १० किलो बियाणे वापरले जाते. परंतु पंजाबच्या तुलनेत आपली जमीन कडक आहे. परिणामी पाच सेंटीमीटर बियाणे पडल्यास पावसामुळे बियाणे दबून ते उगवणार नाही.

- डॉ. गौतम शामकुंवर, धान ब्रिडर, प्रादेशिक संशोधन केंद्र, सिंदेवाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com