Salam Kisan: पंचमहाभूत लोकोत्सवात `सलाम किसान`चा सहभाग

कोल्हापूर येथील कणेरीच्या सिध्दगिरी मठ येथे वसंधुरा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या पंचमहाभूत सुमंगल लोकोत्सवात `सलाम किसान`ने सहभाग घेतला आहे.
Salam Kisan
Salam KisanAgrowon

Salam Kisan App कोल्हापूर येथील कणेरीच्या सिध्दगिरी मठ (Sidhhagiri Math) येथे वसंधुरा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या पंचमहाभूत सुमंगल लोकोत्सवात (Panchmahabhut Sumangal Lokotsav) `सलाम किसान`ने (Salam Kisan) सहभाग घेतला आहे.

जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या पेशीत आहे, या सूत्राभोवती गुफण्यात आलेला पंचमहाभूतांच्या अस्तित्वाचा अविष्कार म्हणून हा लोकोत्सव संपन्न होत आहे. परिषद, प्रदर्शन, प्रवर्तन हे या लोकोत्सवाचे स्वरूप आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सुरू झालेला हा महोत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या महोत्सवात पंचमहाभूत तत्त्वावर आधारित असलेली पाच स्वतंत्र दालने प्रमुख आकर्षणे ठरली आहेत.

आकाश, पृथ्वी, वायू, जल, अग्नी या पाच तत्त्वांवर आधारित या दालनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली आहे. आरोग्य आणि संस्कार यासंबंधी स्वतंत्र दालने आहेत.

महोत्सवस्थळी एक लाख चौरस फूट मंडप उभारला आहे. एकाच वेळी दहा हजार नागरिक कार्यक्रम पाहू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. याशिवाय शेती अवजारे, बी- बियाणे आणि महिला बचत गटांचे मिळून एक हजारहून अधिक स्टॉल आहेत.

Salam Kisan
Salam Kisan: प्रगतिशील शेतकऱ्यांना ‘सलाम किसान'ची साथ

शेतकऱ्यांना उपयुक्त सेवा पुरविणाऱ्या `सलाम किसान`चाही स्टॉल या महोत्सवात आहे. या स्टॉल समोर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

हा कार्यक्रम आठ दिवस विविध विषयांवरच्या नवचैतन्याने रंगून जात आहे. यामध्ये १९ फेब्रुवारी रोजी महाशोभायात्रा, पंचगंगा आरती हे कार्यक्रम झाले. २० फेब्रुवारी रोजी महोत्सवाचा शुभारंभ, २१ फेब्रुवारी रोजी युवा संवाद (आकाश) पार पडला.

तर २२ फेब्रुवारी- उद्योग क्षेत्र (वायु), २३ फेब्रुवारी - संत उत्सव (अग्नि), २४ फेब्रुवारी - महिला उत्सव (जल), २५ फेब्रुवारी- कृषी उत्सव (पृथ्वी), २६ फेब्रुवारी - सांगता सोहळा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Salam Kisan
Salam kisan : सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्सच्या मदतीने यवतमाळच्या शेतकऱ्याची हरभरा शेतीत मोठी झेप

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, विशेष आयुर्वेद दालन, गुरूकुल पद्धती प्रदर्शन, पशु-पक्षी प्रदर्शन, कृषी अवजारे, पारंपरिक कृषी ज्ञान, बीज भांडार ही या महोत्सावाची वैशिष्ट्ये आहेत.

या महोत्सवात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, कुलगुरू, राजदूत, अधिकारी, उद्योजक सहभागी झाले आहेत.

`सलाम किसान`कडून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि उत्पादनांची माहिती या प्रदर्शनात शेतकऱ्यांना दिली जात आहे.

केवळ सात मिनिटात ड्रोन फवारणी, वाहतुक सुविधा, ९० सेकंदातील माती परीक्षण, शीतगृह, गोदाम सुविधा याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

या महोत्सवामध्ये कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन `सलाम किसान`कडून करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com