Bajari Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी पूर्ण

खानदेशात बाजरीची पेरणी काही भागांचा अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर एकूण पेरणी आहे.
Bajari Sowing
Bajari Sowing Agrowon

Bajari Sowing जळगाव ः खानदेशात बाजरीची पेरणी (Millet Sowing) काही भागांचा अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर एकूण पेरणी आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तीन हजार हेक्टरवर पेरणी (Sowing) झाल्याचा अंदाज आहे.

कृषी यंत्रणांकडून पेरणीबाबत सर्वेक्षण सुरूच आहे. परंतु कृषी केंद्रचालकांकडील बाजरी बियाण्याची विक्री व शेतकऱ्यांचा कल यानुसार पेरणी साडेपाच हजार हेक्टरवर पोचल्याचा अंदाज आहे.

बाजरी पेरणीसाठी शेतकऱ्यांनी यंदा पक्ष्यांपासून संरक्षण देणाऱ्या वाणांना पसंती दिली आहे. तसेच कमी कालावधीत आणि मध्यम, हलक्या जमिनीत चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांचीदेखील मागणी होती.

Bajari Sowing
Millets Year 2023: भरडधान्य आहारात महत्त्वाची का आहेत?

काही शेतकरी हरभऱ्याचे पीक घेऊन रिकाम्या झालेल्या क्षेत्रात बाजरीची पेरणी करीत आहेत. सुरुवातीला किंवा खरिपात मका किंवा सोयाबीन, उडीद, मूग, त्यानंतर रब्बीत आगाप किंवा कोरडवाहू क्षेत्रातील देशी हरभरा आणि आता उन्हाळ हंगामासंबंधी बाजरी संबंधित शेतकरी पेरत आहेत.

बाजरीची पेरणी सरतेशेवटी सहा ते साडेसहा हजार हेक्टरवर पोहोचू शकते, असाही अंदाज आहे. कारण अनेक शेतकरी फेब्रुवारीच्या मध्यातही किंवा उष्णता जाणवू लागताच पेरणी करतात.

बाजरीचे बियाणेही बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्याच्या दरातही किंचित किंवा जुजबी वाढ झाली आहे.

Bajari Sowing
Millet Year 2023 : भरड धान्य आरोग्यासाठी फायदेशीर का ठरतात? कोणत्या आजारांना होतो प्रतिबंध?

शिरपूर, चोपडा, जामनेर भागात अनेकांनी बेवडसाठी बाजरीची पेरणी केली आहे. कारण बाजरीचे बेवड केळी, कापूस व इतर पिकांसाठी लाभदायी मानले जाते. तसेच बाजरीचे दरही मागील दोन - तीन हंगाम टिकून आहेत.

कोविड काळातही बाजरीला किमान १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. मागील हंगामात कमाल दर २३०० रुपये प्रतिक्विंटल, असा होता. सध्या बाजारात बाजरीचे दर २४०० रुपये प्रतिक्विंटलवर आहेत. पुढे दरात आणखी वाढ होवू शकते, असाही अंदाज आहे.

...या भागात पेरणी

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, चोपडा, जामनेर, जळगाव या भागांत बऱ्यापैकी पेरणी आहे. धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे व शिरपूर या सर्वच तालुक्यांत पेरणी अपेक्षेप्रमाणे झाली आहे.

नंदुरबारातही नंदुरबार, नवापूर, तळोदा व शहादा भागांत बाजरी पेरणी झाली आहे. पेरणी जानेवारीच्या मध्यातच झाली. काहींनी मागील दोन- तीन दिवसांत पेरणीला वेग दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com