Barsu Refinery Latest News: उध्दव ठाकरेंच्या बारसू येथील सभेसाठी नकारघंटा ; मात्र, रिफायनरी विरोधकांना भेटता येणार

Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे.
Udhhav Thackeray
Udhhav ThackerayAgrowon

Barsu Refinery Update : गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Protest) स्थानिकांनी विरोध केला आहे. प्रकल्पावरून राज्य सरकार विरुध्द स्थानिक असा संघर्ष सुरू आहे.

अशातच स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी ६ मेला बारसूला जाण्याची घोषणा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी केली होती. मात्र, या ठाकरे यांच्या बारसू येथील सभेला परवानगी नाकारल्याची माहिती आता समोर आली आहे.

Udhhav Thackeray
Barsu Refinery Protest : अन्यथा उच्च न्यायालयात जाणार ; रत्नागिरी जिल्हाबंदी प्ररकरणी राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा

कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रकल्पासाठी माती परिक्षणाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केला आहे.

प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांना भेटण्यासाठी ठाकरे बारसूला जाणार असून यावेळी रानतळे येथे त्यांची सभाही होणार आहे.

Udhhav Thackeray
Barsu Protest : बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनावरील सर्व प्रतिबंधात्मक आदेश मागे

मात्र जिल्हा प्रशासनाकडून सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु बारसू गावातील रिपायनरी विरोधातील स्थानिकांना भेटण्याची परवानगी त्यांना प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या विरोधात बारसूतील स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत.

राजापुरातील विविध संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो बारसूवासीय प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच यावेळी नाणारसह बारसू परिसरातील प्रकल्पाला समर्थन करणारे शेतकरी, जमीनदार प्रकल्पासाठी जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com