Livestock Market : परभणी जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरविण्यास परवानगी

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यांतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी स्कीन आजारासाठी २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
Animal Market
Animal MarketAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार (Livestock Market) भरविण्यास तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक, प्राण्यांच्या शर्यतीकरिता सशर्त परवानगी देण्यात आली. त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष आंचल गोयल यांनी सोमवारी (ता. १६) आदेश जारी केला आहे.

परभणी जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनास लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कोणताही जनावरांचा बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत जनावराची वाहतूक करणे, प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्यास अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे.

त्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यांतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी स्कीन आजारासाठी २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग असणे, तसेच टॅग नंबर असणे तसेच ईनाफ पोर्टवर नोंदणी असणे बंधनकारक असेल.

संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

Animal Market
Lampi In Maharashtra : लंपी रोगामुळे 22 जनावरांचा मृत्यू | ॲग्रोवन

गुरांची वाहतूक करताना आरोग्य दाखला तसेच स्वास्थ प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारामध्ये (कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत/ प्रक्षेत्रे) यापुढे टॅगिंग व रोग प्रतिबंधक लसीकरण खात्री झाल्याशिवाय खरेदी विक्री होऊ देऊ नये.

जिल्ह्यात प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्याकरिता जनावरांचे लम्पी आजाराचे लसीकरण झाल्याची खात्री करावी. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com