Chana Pest : बुलडाणा जिल्ह्यात हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यांवर, कळ्यांवर आणि फुलांवर एकेरी अंडी घालते.
Chana Pest
Chana PestAgrowon

बुलडाणा : जिल्ह्यामध्ये हवामानातील बदलामुळे (Climate Change) हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादूर्भाव (Pod Borer Outbreak On Chana Crop) दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे.

हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन केले पाहिजे. सध्या हरभऱ्याचे पीक हे काही ठिकाणी वाढीच्या तसेच बहुतांश ठिकाणी फुलोरावस्थेत आहे. या दरम्यान घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.

Chana Pest
Chana Rate : हरभऱ्याला यंदा चांगला भाव मिळण्याचा अंदाज

घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यांवर, कळ्यांवर आणि फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसांत अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरित द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरके होऊन वाळतात आणि गळून पडतात.

Chana Pest
Chana Market: हरभरा भाव यंदा कसे राहतील?

थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने आणि कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा प्रादूर्भाव वाढतो आणि अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात.

मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

कीटकनाशकांचा जास्त वापर टाळा

घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना घाटे अळीचे परभक्षक बगळे, मैना, राघू, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकांमध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी कीटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी कीटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे कीटकनाशकांचा जास्त वापर टाळावा.

ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल, त्या शेतामधे बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रतिहेक्टर २० पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावेत. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते.

कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com