Pandharpur Potholes : पंढरपुरातील खड्डे बुजवा, स्वच्छतेला प्राधान्य द्या

शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने प्राधान्याने खड्डे बुजवून स्वच्छता करावी. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची कोणतेही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागाने घ्यावी.
Pandharpur Potholes
Pandharpur PotholesAgrowon

सोलापूर ः पंढरपुरात येत्या नाव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. परतीच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे (Heavy Rainfall) मोठ्या प्रमाणात पंढरपूर शहरातील, तसेच शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे (Potholes In Pandharpur) पडले असल्याने प्राधान्याने खड्डे बुजवून स्वच्छता करावी. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची कोणतेही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागाने घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav) यांनी दिल्या.

Pandharpur Potholes
Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : विनयकुमार आवटे

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपुरात बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, मिलिंद पाटील, अरुण फुगे, मंदिर समितीचे लेखाधिकारी अनिल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप केचे, पशुसंवर्धनचे सहा.आयुक्त डॉ. भिंगारे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी गुरव म्हणाले, की यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणीपुरवठा करावा, परतीच्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साठल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असल्याने तत्काळ फवारणी करून घ्यावी. चंद्रभागा वाळवंटात पुरेशा प्रकाश राहील या बाबत नियोजन करावे, धोकादायक इमारतींवर सूचना फलक लावावेत. अनधिकृत फलक काढावेत, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदिर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेडिंग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी, असेही ते म्हणाले.

दर्शनासाठी जादाचे पत्राशेड उभारावेत

आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, ऑक्सिजन, रक्तपुरवठा तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील या बाबत नियोजन करावे. तसेच यात्रा कालावधीत मंदिर समितीने जादाचे पत्राशेड उभारावेत, दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. दर्शनरांगेत व दर्शन मंडपात भाविकांना स्वच्छ पिण्याच्या व्यवस्था करावी. मंदिरात तसेच मंदिराभोवती करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईचे फायर ऑडिट करून घ्यावे, असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com