
Pune News नारायणगाव, जि. पुणे ः ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी (Drinking Water) उपलब्ध व्हावे. महिलांचा डोक्यावरील हंडा खाली यावा.
या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra Modi) यांनी ‘घर घर नल से जल’ या योजनेअंतर्गत सत्तर हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या पैकी पुणे जिल्ह्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.
जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी वारूळवाडी ग्रामपंचायतीला ४७ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, ‘विघ्नहर’चे संचालक संतोषनाना खैरे, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच ज्योती संते, तहसीलदार रवींद्र सबनीस, उद्योजक संजय वारुळे, बाजार समितीचे माजी संचालक विपुल फुलसुंदर, सदस्य जंगल कोल्हे, आत्माराम संते, माया डोंगरे, नारायण दुधाने, प्रकाश भालेकर, देवेंद्र बनकर, विनायक भुजबळ, संगीता काळे, रेखा फुलसुंदर, राहुल फुलसुंदर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की ग्रामीण भागातील जनतेचे दुःख संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे.
सात कोटी स्वच्छतागृहांची उभारणी, नऊ कोटी घर तिथे गॅस कनेक्शन, तीनशे चौरस फुट क्षेत्रफळाच्या दीड कोटी घरांचे वाटप, ‘हर घर नल से शुद्ध जल’, महिलांसाठी मातृवंदना योजना या योजनांअंतर्गत जन्माला आलेल्या मुलीला वयाच्या अठरा वर्षांपर्यंत एक लाख रुपयांची मदत केली जाते.
सरपंच मेहेर म्हणाले, की वारुळवाडी परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत होणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे पुढील तीस वर्षे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेद्वारे प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषद सदस्या बुचके यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.