Ration Grain : स्वस्त धान्य वेळेवर मिळावे

वेगवेगळ्या योजनांमुळे वाहतूक ठेकेदार दोन वेळा वाहतूक होणाऱ्या उशिरा धान्य पुरवठामुळे रास्त भाव दुकानदार व कार्डधारकांमध्ये वाद-विवाद होत असतात.
Ration Shop
Ration ShopAgrowon

Ration Shop in Nandurbar : स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय धान्य (Ration Grain) वेळेवर पोहोच होत नसल्यामुळे कार्डधारकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

पूर्वीप्रमाणेच धान्य वितरण व वाहतूक सुरू करून लाभार्थ्यांना वेळेवर स्वस्त धान्य मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य महेंद्र मंगा चौधरी यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची फक्त शहरी भागासाठी थेट रास्त भाव धान्य दुकानदारांना शासकीय धान्य वाहतूक पोच सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १५ जानेवारी २०२१ च्या आदेशामुळे थेट वाहतूक फक्त शहरी भाग जानेवारी २०२३ नियमित साठा एनएफएसए मोफत आलेला नाही.

Ration Shop
Ration Shops : रेशन दुकानांना ‘कार्पोरेट लूक’

या कारणामुळे पात्र कार्डधारकांची गैरसोय झाली आहे. कार्डधारक अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. त्यांना नियमित साठा वेळेवर मिळावा.

थेट वाहतूक संबंधित शहरी भाग वेगळा व ग्रामीण भाग वेगळा हा निर्णय न घेता शहरी व ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानदारांना पूर्वीप्रमाणेच वाहतूक सुरू ठेवावा, थेट वाहतूक शहरी भाग धान्यसाठा वेळेवर येत नाही.

वेगवेगळ्या योजनांमुळे वाहतूक ठेकेदार दोन वेळा वाहतूक होणाऱ्या उशिरा धान्य पुरवठामुळे रास्त भाव दुकानदार व कार्डधारकांमध्ये वाद-विवाद होत असतात. त्यामुळे हा निर्णय सचिवांनी रद्द करावा.

Ration Shop
Ration Shop : स्वस्त धान्यासाठी लाभार्थ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

थेट वाहतूक फक्त शहरी भागातील मालवाहतूक करताना होणारी अडचण समजून जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, अध्यक्ष रास्त भाव दुकानदार संघटना, ग्राहक मंच सोबत बोलावून निर्णय घ्यावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com