Lumpy Skin : गाळप हंगामात घुंगरांचा आवाज मंदावला

यंदा राज्यात ऊस वाहतुकीसाठी कारखान्याकडे येणाऱ्या बैलगाड्यांची संख्या तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी रोडावली आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon

कोल्हापूर : यंदा राज्यात ऊस वाहतुकीसाठी (Sugarcane Transportation) कारखान्याकडे येणाऱ्या बैलगाड्यांची (Bullock Cart) संख्या तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी रोडावली आहे. ‘लम्पी स्कीन’च्या (Lumpy Skin Disease) प्रादुर्भावामुळे मजुरांना उपलब्ध न झालेल्या बैल जोड्या व बैल जोड्यांना जोपासण्यासाठी आवाक्या बाहेर गेलेला खर्च यामुळे यंदा बैलगाड्यांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. बैलगाड्याची जागा आता ट्रॅक्टर बैलगाडी म्हणजेच अंगदने घेतली आहे. गाड्यांची संख्या कमी झाल्याने कारखान्यांना येणाऱ्या ताज्या उसाचे प्रमाण मात्र कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रिकव्हरी वरही होणार आहे.

Sugarcane Season
Lumpy Skin : लम्पी स्कीन ’मुळे बीड जिल्ह्यात ८४ जनावरांचा मृत्यू

कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होताच ऊस पट्यातील प्रत्येक गावांच्या वेशीवर पहाटे बैल गाड्यांची वर्दळ असायची. बैलांच्या दुडकी चालीने होणारा घुंगरांचा आवाज शिवारांना जागे करत उसाच्या फडात ऊस भरणीसाठी जातो. कारखान्याना दहा किलोमीटरच्या आतील ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या म्हणजे हक्काचं वाहन.

राज्यात ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर, ट्रकचा वापर प्राधान्याने होत असला तरी जवळच्या वाहतुकीसाठी मात्र बैलगाड्यांचा वापर पारंपरिक आहे. ट्रॅक्टर, ट्रक बरोबर बैलगाड्याने होणारी वाहतूकही कारखान्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरते. ऊस तोडणी झाल्यानंतर चार ते पाच तासांच्या आत ऊस बैलगाड्यातून गाळपासाठी येत असतो. एका बैलगाडीत सुमारे दोन टनापर्यंत ऊस असतो.

Sugarcane Season
Lumpy Skin : फिरत्या पशुचिकित्सालयामुळे ‘लम्पी’चे ९० टक्के लसीकरण

ताजा ऊस गाळपासाठी आल्याने शेतकरी व कारखानदार दोघांनाही याचा फायदा होतो. पण ऊस हंगाम सुरू होण्याआधी दोन महिने अगोदर राज्यभर ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झाला. बहुतांशी जनावर बाजार बंद राहिले. याचा फटका बैल खरेदी करणाऱ्या मजुरांनाही बसला. बैल उपलब्ध न झाल्याने बैलगाड्यांची संख्या ही कमी झाली. पर्यायाने बैलाऐवजी छोटे ट्रॅक्टर घेऊन त्याला ट्रेलर ऐवजी बैलगाडीला असणारी टायरीची गाडी जोडून ट्रॅक्टर गाडीची संकल्पना राबवण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारच्या गाड्यात थोडी थोडी वाढ होती. यंदा मात्र तब्बल ४० टक्क्यांपर्यंत तर काही कारखान्यांना ५० टक्क्यांपर्यंत बैलगाड्या कमी मिळाल्या आहेत. एका अंगदमध्ये सात ते आठ टनांपर्यंत ऊस भरला जातो. तीन ते चार बैलगाड्यांचा ऊस एकाच ट्रॅक्टर गाडीत भरला जात असल्याने मजुरांनाही ते सोयीचे ठरत असल्याचे चित्र या हंगामात आहे. बैलांचा सांभाळ करणे कठीण झाल्याने आता छोटे ट्रॅक्टर घेण्याकडे मजुरांचा कल वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com