Colored Cotton Verity : रंगीत कापसाचे दर्जेदार वाणासंबंधी होणार संशोधन

करारानुसार नैसर्गिक रंगीत कापसाचे दर्जेदार वाण विकसित करण्यासह कापसाच्या सरळ वाणात बीटी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, कापसातील यांत्रिकीकरण, मूल्यवर्धन यावर संशोधन केले जाईल.
Cotton Color
Cotton Color Agrowon

Colored Cotton Verity परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) (आयसीएआर) अंतर्गत मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी सिरकॉट) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात गुरुवारी (ता.१७) सामंजस्‍य करार करण्‍यात आला.

या करारानुसार नैसर्गिक रंगीत कापसाचे दर्जेदार वाण (Color Cotton Verity) विकसित करण्यासह कापसाच्या सरळ वाणात बीटी तंत्रज्ञानाचा (BT Technology) अंतर्भाव, कापसातील यांत्रिकीकरण, मूल्यवर्धन यावर संशोधन केले जाईल.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. अशोककुमार भारीमल्‍ला, शास्‍त्रज्ञ डॉ. मनोजकुमार माहावार, शास्‍त्रज्ञ डॉ. ज्‍योती ढाकणे लाड, पैदासकार डॉ. खिजर बेग यांनी करारावर स्‍वाक्षरी केल्‍या.

या वेळी कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक दीपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ. उदय खोडके, डॉ. व्‍ही. एन. नारखेडे, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. प्रवीण कापसे आदी उपस्थिती होती.

Cotton Color
Colorful Grape Verity : रंगीत द्राक्षजातीमध्ये एकसारखा रंग येण्यासाठी उपाययोजना

डॉ. मणी म्‍हणाले, ‘‘या करारामुळे दोन्‍ही संस्‍थेच्‍या कापूस पिकातील संशोधनास चालना मिळेल. कापसाच्या उत्‍पादन वाढीस मदत होईल.’’

डॉ. वासकर म्हणाले,‘‘नैसर्गिक रंगीत कापूस वाण निर्मिती व कापसाच्‍या सरळ वाणात ‘बीटी’चा अंतर्भाव यावर संशोधन करण्‍यात येईल.’’

Cotton Color
Color Cotton Verity : नैसर्गिक रंगीत कापसाचे तीन वाण विकसित

डॉ. बेग म्हणाले, ‘‘कापड निर्मितीसाठी उच्च दर्जा आणि अधिक उत्पादन देणाऱ्या रंगीत कापसाचे वाण विकसित केले जातील. या करारामुळे दोन्‍ही संस्‍था एकत्रितरीत्या कापूस पिकांवर अत्‍याधुनिक संशोधन प्रकल्‍प राबविणार आहेत.

त्यात कापूस पिकांतील यांत्रिकीकरण, मूल्‍यवर्धन, काढणीपश्‍चात प्रक्रिया, कृ‍त्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पीक उत्‍पादन आणि संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणे, नॅनो तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आदी क्षेत्रात दीर्घकालीन संशोधनास चालना मिळेल.

विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी आणि शेतकरी यांच्‍या करिता प्रशिक्षण घेण्यात येईल. दोन्‍ही संस्‍थांच्‍या कापूस पिकांबाबतची माहिती, ज्ञान व कौशल्‍य यांची देवाणघेवाण करण्‍यास मदत होईल. कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेतील अत्‍याधुनिक प्रयोगशाळांतील धागा चाचणी प्रयोगशाळेची विद्यापीठाच्‍या संशोधनास मदत होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com