
औरंगाबाद : सामाजिक जाणिवांचे भान ठेवून लोकसहभागातून अकोल्यातील मोरणा व औरंगाबादच्या खाम नदीचे पुनरुज्जीवन (River Revival) केल्याबद्दल जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह ()Dr. Rajendra Singh यांनी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) व त्यांच्या सहकार्याच्या कामाचे कौतुक करत या उपक्रमाचा आदर्श महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांनी घ्यावा, असे गौरवोद्गार काढले.
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे जल यात्रेनिमित्त नाशिकहून औरंगाबाद येथे येऊन गेले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली ‘चला जाणूया नदीला’ व नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
डॉ. सिंह म्हणाले, की आस्तिककुमार पाण्डेय यांनी लोकसहभागातून अकोल्यातील मोरणा तसेच खाम नदीचा कायापालट केला. या नद्यांचे पुनरुज्जीवन करत गतवैभव प्राप्त करुण दिले आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय प्रशिक्षण देताना अशा प्रकारच्या सामाजिक कामाचेही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नद्यांच्या विकासासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत नद्यांचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी म्हणाले, अकोला येथील मोरणा नदी आणि औरंगाबादच्या खाम नदीच्या सौंदर्यीकरणाच्या कामात नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी तसेच सेवाभावी संस्था, युवक, युवती आणि विशेषत: महिलांच्या श्रमदानातून नद्यांचा कायापालट केलेला आहे.
लोकांचा उत्साह, आत्मविश्वास आणि ऊर्जा यातून हे शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद पंचायत समितीमधील संबंधित अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.