Orange Rate : मुहूर्ताच्या संत्र्याला काय दर मिळाला?

नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मृग बहरातील मुहूर्ताच्या संत्र्याला ३५ ते ४२ हजार रुपये प्रति टन असा विक्रमी भाव मिळाला.
Nagpur Orange
Nagpur OrangeAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : नरखेड कृषी उत्पन्न बाजार (Narkhed APMC) समितीत मृग बहरातील मुहूर्ताच्या संत्र्याला ३५ ते ४२ हजार रुपये प्रति टन असा विक्रमी भाव मिळाला.

या वेळी पहिल्यांदा लिलाव होणाऱ्या संत्रा (Orange) ढिगाचे शेतकरी धनराज काळबांडे यांचा सभापती सुरेश आरघोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाजार समितीत मुहूर्ताला सुमारे ४५० गाड्यांची आवक झाली.

या वेळी उपसभापती चंद्रशेखर मदनकर, संचालक दिनेश्‍वर राऊत, संजय दळवी, मनीष फुके, रूपेश मुंडाफळे, अशोक राऊत, संचालक व व्यापारी मुशीर शेख उपस्थित होते. व्यापारी लल्लन प्रसाद साह, विलायतीलाल सहगल, ओमप्रकाश मैनानी, बबूमिया पठाण बरेलीवाले, नाजीम पठाण, अशपाक पठाण, हादी काझी, शेख सादिक, मुस्ताक पठाण यांनी लिलावात भाग घेऊन संत्रा खरेदी केला.

Nagpur Orange
Cotton Rate : कापसाचे मुहूर्ताचे दर नऊ हजार रुपये राहणार

या वेळी माजी संचालक संतोषराव महंत, प्रशांत भोसले, ओम खत्री, सुदर्शन नवघरे, जाकीर शेख, गुणवंत काळे, अशोक राऊत, राजू जावळकर, बाजार समितीचे सचिव सतीश येवले, कोशपाल राधेशाम मोहरीया, कनिष्ठ लिपिक सुनील कडू, पुरुषोत्तम दातीर, अमोल ठाकरे, रवींद्र बांदरे, विनोद रहाटे, धीरज डफरे, अशोक कुकडे, प्रकाश वासने, राहुल सोमकुवर व परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Nagpur Orange
Orange Market : संत्री दर दबावात

संत्र्याला योग्य भाव मिळावा याकरिता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्री व मोसंबी बाजार समितीच्या खुल्या लिलावात विक्रीसाठी आणण्याचे आवाहन सुरेश आरघोडे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com